महाकाय वडाच्या झाडाने अडवले ओढ्याचे पात्र
कुंभारगांव /राजेंद्र पुजारी यांचेकडून
कुंभारगांव तालुका पाटण येथील राजेंद्र जगन्नाथ देसाई यांच्या वाळूसरा या शिवारातील शेतजमीनीच्या जवळून ओढा वाहतो या ओढ्याला कुंभारगाव परिसरातील बारा वाडी वस्तीतील व डोंगरदऱ्यातील पाण्याचा प्रवाह या ओढ्याला मिळतो. मुसळधार पाऊस झाल्यावर प्रचंड पाणी या ओढ्याला येते. या ओढ्याच्या शेत जमिनीलगत दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वीचा महाकाय वडाचे झाड होते. गेल्या पंधरा दिवसापूर्वी या विभागात जोरदार मुसळधार पाऊस पडला होता यावेळी ओढ्याला प्रचंड प्रमाणात पाणी आले होते.
यावेळी पाऊस चालू असताना हा महाकाय वृक्ष ऊनमळून ओढ्याच्या पात्रात आडवा पडला . या नैसर्गिक आपत्तीची माहिती मिळताच विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सुनिता चाळके सौ सुनीता चाळके, पाटण पंचायत समिती सदस्य सचिन यादव, तानाजी चाळके यांनी घटना स्थळी वाळू सरा या शिवारात ओढ्याच्या पत्रात वडाचे झाड पडलेले याची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी हे झाड वेळीच काढले नाही तर पाऊस मोठा झाल्यास ओढ्याला पाणी आले तर ओढ्याच्या शेजारील शेतीचे नुकसान होऊ शकते अशी भीती पंचायत समिती सदस्य सचिन यादव यांनी व्यक्त केली या नैसर्गिक आपत्ती बाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करत असल्याचे सांगितले होते १७ जुलै रोजी महाराष्ट्र शासन कोयना सिंचन जनसंपदा विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राहुल कंक,मोजणीदार विद्या कांबळे,सहाय्यक स्वप्नाली फाळके, आदींनी स्थल पाहणी केली दोन दिवसात या ओढ्याचे पात्र मोकळे केले जाईल असे सांगितले.

Comments
Post a Comment