कुंभारगाव येथे अजितदादा पवार यांना अभिवादन




कुंभारगाव/राजेंद्र पुजारी यांचेकडून 

२२ जुलै २०२६ महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार नवभारत इग्लिश मिडीयम स्कूल,कुंभारगांव, ग्रामपंचायत कुंभारगांव याठिकाणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या ६७ व्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून दादांच्या प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारताचा नकाशा फुल व झाडाच्या पानाच्या कलाकृतीने बनवला व नकाशाच्या कडेने मेणबती प्रज्वलित करून स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यानंतर काकासाहेब चव्हाण कॉलेजचे प्राध्यापक सचिन पुजारी यांनी दादाच्या विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे माजी जि.प.चे सभापती सातारा जिल्हा रा.काँग्रेस चे कार्याध्यक्ष श्री संजय देसाई यांनी स्वर्गीय अजित पवार दादा यांना अभिवादन केले व त्यांच्या कार्याच्या आठवणी याप्रसंगी जागृत केल्या या अभिवादन कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापिका अनुराधा खोत यांनी केली तर आभार उपमुख्याध्यापिका यांनी मानले या प्रसंगी शाळेच्या शिक्षिका,कर्मचारी, साखर कारखान्याचे संचालक, ग्रामपंचायत माजी सदस्य,ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

अक्षरप्रेमींचा गौरव..! राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न