Posts

डाकेवाडीत पर्यावरणपूरक वटपौर्णिमा; अनिल डाकवे अन् विकास जाधव यांच्याकडून 100 वडाच्या रोपांचे वाटप

Image
तळमावले/वार्ताहर वटपौर्णिमेचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) या गावामध्ये एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. गावातील अनिल डाकवे आणि विकास जाधव यांनी एकत्र येत गावातील महिलांना तब्बल 100 वडाच्या झाडांच्या रोपट्यांचे मोफत वितरण केले. याप्रसंगी मंडलाधिकारी निकम, मंडलाधिकारी कुलकर्णी, तलाठी अक्षय लोहार, पोलीस पाटील गणेश डाकवे, शिपाई दत्ता डाकवे व गावातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या पर्यावरणपूरक पुढाकाराचे संपूर्ण परिसरातून भरभरून कौतुक होत आहे. वटपौर्णिमेला हिंदू संस्कृतीत विशेष महत्त्व असून या दिवशी महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. मात्र, अलीकडच्या काळात वडाची झाडे कमी होत चालली आहेत. हीच गरज ओळखून केवळ पूजा न करता निसर्गाचे रक्षण व्हावे या उद्देशाने अनिल डाकवे आणि विकास जाधव या तरुणांनी हा अनोखा संकल्प केला. गावातील महिलांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि मिळालेली रोपटी आपल्या अंगणात किंवा शेतात लावून त्यांचे जतन करण्याचा संकल्प केला. केवळ वडाच्या फांदीची पूजा करण्यापेक्षा, जर प्रत्येकाने एक वडाचे झाड लावून ते जगवले त...

20 व्या आशियाई स्पर्धेकरीता भारतीय ऍथलेटिक्स संघामध्ये कुशल मोहितेची निवड

Image
तळमावले  स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथे शिक्षण घेत असलेला मेहनती खेळाडू कुशल कुमार मोहिते (B.Sc.भाग 3) या विद्यार्थ्याने भुवनेश्वर या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत डेकॅथलॉन क्रीडा प्रकारामध्ये अभिमानास्पद कामगिरी करीत 7251 गुण प्राप्त केले. कुशलने  जिद्द, गुणवत्ता, कौशल्यपूर्वक अथक प्रयत्नांनी हे यश मिळविले आहे. त्याची जपान येथे होणाऱ्या 20 व्या आशियाई स्पर्धेकरिता भारतीय ऍथलेटिक्स संघामध्ये निवड होण्याचा सन्मान मिळविला आहे. ही अत्यंत गौरवास्पद  गोष्ट आहे.  कुशलच्या उल्लेखनीय यशामुळे काकासाहेब चव्हाण कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्वप्नं मोठी असतील तर यशाची उंचीही मोठी असते.             श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आदरणीय  कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे तसेच संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रो. (डॉ.) उषादेवी साळुंखे ,   विक्रांत सुपुगडे, लक्ष्मण भिंगारदिवे (शार...

शिवसमर्थ परिवारातर्फे जनसेवकाचा सन्मान

Image
  गृह रक्षक दलाचे पलटण नायक श्री. शंकर यशवंत देसाई यांचा सत्कार शिवसमर्थ परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचा आणखी एक आदर्श नमुना म्हणून गृह रक्षक दलाचे पलटण नायक श्री. शंकर यशवंत देसाई यांच्या सेवानिवृत्ती निमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. समाजातील कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिक व जनसेवेसाठी आयुष्य वेचलेल्या व्यक्तींचा गौरव करण्याची परंपरा शिवसमर्थ परिवाराने सातत्याने जपली असून, त्याच परंपरेचा भाग म्हणून हा सोहळा उत्साहात पार पडला. उपस्थितांनी श्री. देसाई यांच्या सेवाकार्याचा गौरव करताना शिवसमर्थ परिवाराच्या समाजाभिमुख उपक्रमांचेही विशेष कौतुक केले. सामाजिक, शैक्षणिक, सहकार आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात शिवसमर्थ परिवाराने उभे केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. समाजातील चांगल्या कार्याचा सन्मान व्हावा, सेवाभावी व्यक्तींना प्रोत्साहन मिळावे आणि नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने शिवसमर्थ परिवार सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, हा सत्कार त्याच विचारसरणीचे प्रतीक ठरला. श्री. शंकर यशवंत देसाई यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभाची निमंत्रण...

काळगावचे कविवर्य दिलीप पवार यांना 'आदर्श कविरत्न गौरव पुरस्कार' जाहीर

Image
काळगाव / प्रतिनिधी: बेडकीहाळ (जि. बेळगाव, कर्नाटक) येथील नामांकित 'कै. बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्था (ट्रस्ट)' च्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित 'नॅशनल एक्सलन्स गोल्ड स्टार अवॉर्ड - २०२६' अंतर्गत 'राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. यामध्ये काळगाव येथील प्रख्यात कविवर्य मा. श्री. दिलीप पवार यांची 'आदर्श कविरत्न गौरव पुरस्कारा'साठी अत्यंत मानाने निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय व आदर्शवत कार्य करणाऱ्या व्यक्तींना या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविले जाते. कविवर्य दिलीप पवार यांनी साहित्य आणि काव्य क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण आणि बहुमूल्य योगदानाची दखल घेऊन संस्थेने यंदाचा हा सर्वोच्च बहुमान त्यांना बहाल केला आहे. या राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप अत्यंत सन्माननीय असून, यामध्ये कोल्हापुरी फेटा, श्रीफळ, सन्मानचिन्ह, गौरव पत्र आणि मेडल यांचा समावेश आहे. कै. बसवंत नागू शिंगाडे सामाजिक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. विक्रम बसवंत शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,...

डाकेवाडी येथे श्री दुर्गामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

Image
तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील आणि श्री नूतन सेवा मंडळ आणि श्री त्रिमूर्ती सार्वजनिक उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला श्री दुर्गामाता मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दोन दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात बुधवारी दुपारी माताजींच्या भव्य मिरवणुकीने झाली. या मिरवणुकीत परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर सायंकाळी गणपती पूजन, पुण्याह वाचन, देवतार्पण आणि अग्नी स्थापना करण्यात आली. श्री दुर्गामाता मूर्तीस जलाधिवास व धान्याधिवास हे विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून स्थापित देवता पूजन, होम-हवन आणि वास्तू होम पार पडले. सकाळी १० वाजता मंत्रोच्चाराच्या जयघोषात श्री दुर्गामाता मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली, तर सकाळी ११ वाजता मंदिराचे कलशारोहण संपन्न झाले. दुपारी श्री दुर्गामातेची महापूजा, आरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारच्या सत्रात महिलांस...

अ. भा. बेळगाव मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. यशवंत पाटणे

Image
तळमावले/प्रतिनिधी           अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. यशवंत पाटणे यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन रविवार, दि. २४ रोजी मराठा मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरीत पार पडणार आहे.           प्रा. पाटणे हे महाराष्ट्रातील प्रभावी वक्ते आणि साहित्यिक म्हणून परिचित आहेत. ‘सहावे सुख’, ‘चैतन्याचे चांदणे’ आणि ‘जगाच्या कल्याणा’ यांसारखी त्यांची अनेक पुस्तके वाचकप्रिय ठरली आहेत. शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कारासह विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.           संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात पुण्याचे शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज : आजच्या काळातील गरज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच तिसऱ्या सत्रात कव...

धनावडेवाडी येथे १९ मेला १७ वा भव्य 'श्री साई भंडारा' उत्सव

Image
ढेबेवाडी/वार्ताहर तालुक्यातील धनावडेवाडी (निगडे) येथे ओम साई अशोक मित्र मंडळाच्या वतीने १७ व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या भव्य 'श्री साई भंडारा' उत्सवाचे आयोजन मंगळवार, दिनांक १९ मे २०२६ रोजी करण्यात आले आहे. या सोहळ्यात दिवसभर विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी भाविकांना मिळणार आहे. या उत्सवाचा प्रारंभ सकाळी ८ वाजता होम-हवन आणि सत्यनारायण महापूजेने होणार असून सकाळी ११ वाजेपर्यंत हे धार्मिक विधी पार पडतील. त्यानंतर दुपारी १२ ते २ या वेळेत परिसरातील महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता श्री साईनाथांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीने संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होणार आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत महाप्रसादाचे (भंडारा) वाटप करण्यात येईल. रात्री ७ वाजता 'ओम साई भजन मंडळ, धनावडेवाडी निगडे' यांच्या सुस्वर भजनाचा कार्यक्रम संपन्न होईल. भजनानंतर रात्री ८ वाजता महिलांसाठी विशेष 'होम मिनिस्टर' स्पर्धा आणि ८:३० वाजता लहान मुलांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे ख...