20 व्या आशियाई स्पर्धेकरीता भारतीय ऍथलेटिक्स संघामध्ये कुशल मोहितेची निवड
तळमावले
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचालित काकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावले येथे शिक्षण घेत असलेला मेहनती खेळाडू कुशल कुमार मोहिते (B.Sc.भाग 3) या विद्यार्थ्याने भुवनेश्वर या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत डेकॅथलॉन क्रीडा प्रकारामध्ये अभिमानास्पद कामगिरी करीत 7251 गुण प्राप्त केले. कुशलने जिद्द, गुणवत्ता, कौशल्यपूर्वक अथक प्रयत्नांनी हे यश मिळविले आहे. त्याची जपान येथे होणाऱ्या 20 व्या आशियाई स्पर्धेकरिता भारतीय ऍथलेटिक्स संघामध्ये निवड होण्याचा सन्मान मिळविला आहे. ही अत्यंत गौरवास्पद गोष्ट आहे. कुशलच्या उल्लेखनीय यशामुळे काकासाहेब चव्हाण कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. स्वप्नं मोठी असतील तर यशाची उंचीही मोठी असते.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आदरणीय कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. कौस्तुभ गावडे तसेच संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रो. (डॉ.) उषादेवी साळुंखे , विक्रांत सुपुगडे, लक्ष्मण भिंगारदिवे (शारीरिक शिक्षण संचालक), गुरुदेव कार्यकर्ते, काकासाहेब चव्हाण कॉलेज माजी विद्यार्थी मंडळ, तळमावले सर्व कार्यकारिणी सदस्य, ग्रामस्थ आदींनी कुशलच्या उज्वल भविष्यासाठी आणि पुढील स्पर्धसाठी अभिनंदन करून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment