डाकेवाडी येथे श्री दुर्गामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

तळमावले/वार्ताहर

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील आणि श्री नूतन सेवा मंडळ आणि श्री त्रिमूर्ती सार्वजनिक उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला श्री दुर्गामाता मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दोन दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात बुधवारी दुपारी माताजींच्या भव्य मिरवणुकीने झाली. या मिरवणुकीत परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर सायंकाळी गणपती पूजन, पुण्याह वाचन, देवतार्पण आणि अग्नी स्थापना करण्यात आली. श्री दुर्गामाता मूर्तीस जलाधिवास व धान्याधिवास हे विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले.

गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून स्थापित देवता पूजन, होम-हवन आणि वास्तू होम पार पडले. सकाळी १० वाजता मंत्रोच्चाराच्या जयघोषात श्री दुर्गामाता मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली, तर सकाळी ११ वाजता मंदिराचे कलशारोहण संपन्न झाले. दुपारी श्री दुर्गामातेची महापूजा, आरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

दुपारच्या सत्रात महिलांसाठी हळदी-कुंकू व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. रात्री ७ ते ९ या वेळेत ह.भ.प. सौ.जयश्रीताई धायटी यांचे सुश्राव्य हरि कीर्तन झाले. कार्यक्रमाची सांगता रात्री उशिरापर्यंत चाललेल्या जागर गोंधळ या कार्यक्रमाने झाली. कराडकर वस्ती, डाकेवाडी (काळागाव), ता. पाटण येथील भाविकांनी या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे नियोजन अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय बाळू डाकवे (अध्यक्ष), आनंदा रामचंद्र डाकवे (उपाध्यक्ष), तुकाराम डाकवे, ज्ञानदेव डाकवे, सखाराम डाकवे, मारुती डाकवे, तुकाराम डाकवे, किसन डाकवे, आनंदा ना. डाकवे, बाळू डाकवे, विठ्ठल डाकवे, ज्ञानदेव निस्कुळ, मारुती निस्कुळ, विलास डाकवे, जयवंत डाकवे, महादेव डाकवे, महेश डाकवे, सागर डाकवे, रोहित डाकवे, प्रथमेश डाकवे, ओम डाकवे, साहिल डाकवे, सूरज डाकवे, राहुल डाकवे, राजू डाकवे, किरण निस्कुळ, अरुण निस्कुळ, शंकर निस्कुळ, गणेश निस्कुळ, मच्छिंद्र डाकवे व अन्य यांनी विषेश परिश्रम घेतले.


Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग