Posts

हयात प्रमाणपत्र न दिल्यास पेन्शन बंद होणार - तहसीलदार अनंत गुरव

कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून                सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमधून ७२०० लाभार्थ्यांना पेन्शन दिली जाते शासन निर्णय ७ मे २०२६ अन्वये सर्व  लाभार्थ्यांना Beneficiary Satyapan App द्वारे ( डिजिटल लाइफ सर्टिफिकेट) हयात असल्याचे प्रमाणपत्र काढण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्यानुसार आज अखेर ६६८७ लाभार्थ्यांनी Beneficiary Satyapan App द्वारे डिजिटल प्रमाणपत्र काढलेले आहेत.           मात्र अद्याप ५९३ लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र काढलेली नाहीत जे  लाभार्थी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट करणार नाहीत अशा लाभार्थ्यांची पेन्शन बंद करण्यात येणार आहे असा इशारा प्रशासनाने दिला आहे तरी या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले काढलेले नाहीत अशा लाभार्थ्यांनी संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक ग्रामपंचायत मधील संगणक परिचालक तसेच महा-ई-सेवा केंद्र, तहसील कार्यालयातील संजय गांधी शाखा मधून आयातीचे दाखले काढून घ्यावेत असे आवा...

गांजणी माशीच्या पोळ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Image
कुंभारगांव/राजेंद्र पुजारी यांचेकडून कुंभारगाव, ता. पाटण येथील मुख्य बाजारतळ व रहदारीच्या ठिकाणी असलेल्या एका आंब्याच्या झाडावर गांजणी माशीचे (डंकारी मधमाशांचे) पोळे तयार झाले आहे. दिवसेंदिवस या पोळ्याचा आकार वाढत चालला असून, यामध्ये हजारो माशा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे पोळे अत्यंत धोकादायक स्वरूप धारण करत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या वाढत्या धोक्याची प्रचिती आजच आली असून, दोघा व्यक्तींच्या हात आणि गुढघ्यावर गांजणी माशीने डंख केला. त्यांना तातडीने तळमावले येथील डॉ. ताईगडे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले; प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र, या पोळ्यातील माशांनी सामूहिक हल्ला केल्यास माणसाच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती जाणकार नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी हे पोळे तयार झाले आहे, त्या परिसरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी, पशुवैद्यकीय दवाखाना, मंदिर आणि आठवडी बाजार भरण्याची जागा आहे. यामुळे या मार्गावरून शालेय विद्यार्थी, लहान मुले, महिला, भाविक आणि बाजारकरूंची सतत वर्दळ असते. एखादी मोठी दु...

जि.प.प्रा. शाळा, कुठरेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी घेतला ‘विषमुक्त अन्न, सुरक्षित जीवन’चा अनुभव

Image
तळमावले/वार्ताहर  गणेशोत्सवाच्या माध्यमातून भक्तीबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरणपूरक संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा अभिनव उपक्रम श्री. सुनील पवार सर यांच्या घरी साकारण्यात आला आहे. “आपला बाप्पा – विषमुक्त अन्न, सुरक्षित अन्न, सुरक्षित जीवन” ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून साकारलेल्या या आगळ्यावेगळ्या देखाव्यात कुठरे गावाची प्रतिकृती, ग्रामीण जीवनशैली, शेती, घरगुती अन्नसंस्कृती, सेंद्रिय शेती, गांडूळ खत, जलसंवर्धन आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. जि. प. प्राथमिक शाळा, कुठरे येथील विद्यार्थी व शिक्षकांनी या देखाव्यास भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने प्रत्येक प्रतिकृतीचे निरीक्षण केले. प्रत्यक्ष कृती व देखाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्य, अन्नसुरक्षा, शेती आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. आजच्या काळात सुरक्षित आणि दर्जेदार अन्नाची गरज वाढत असताना शेतीमध्ये सेंद्रिय खत, गांडूळ खत आणि नैसर्गिक शेती पद्धतींचा वापर करण्याचे महत्त्व या देखाव्यातून सांगण्यात आले आहे. जमिनीची ...

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल; १ नोव्हेंबरला मतदान, ३ नोव्हेंबरला मतमोजणी

Image
सातारा/स्पंदन एक्सप्रेस वृत्तसेवा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी संचालक मंडळाच्या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. बँकेच्या २१ संचालकपदांसाठी ही निवडणूक होणार असून, १ नोव्हेंबर २०२६ रोजी मतदान, तर ३ नोव्हेंबर २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. अधिकृत निवडणूक कार्यक्रमानुसार २५ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहणार आहे. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची यादी १ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर उमेदवारी अर्जांची छाननी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी निवडणूक कार्यालयात करण्यात येणार आहे. छाननीनंतर वैध ठरलेल्या उमेदवारी अर्जांची यादी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीसाठी २१ ऑक्टोबरपर्यंत मुदत उमेदवारांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ६ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२६ अशी मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. २१ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे ...

शेतकरी महिलांना मिळणार २ ऑक्टोबर पासून अधिकृत प्रमाणपत्र

Image
तळमावले/राजेंद्र पुजारी यांचेकडून                महाराष्ट्र राज्यातील महिला शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात अधिकृत ओळख मिळावी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ व्हावे यासाठी राज्य शासनाने महिला शेतकरी धोरण राबवले असून येत्या २ ऑक्टोंबर पासून महिला शेतकरी प्रमाणपत्र वाटप सुरू करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्जासाठी कृषी विभागाचे अधिकृत पोर्टल कार्यान्वित झाले आहे महिला शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ कृषी कर्ज पिक विमा कृषी निविष्ठा तसेच कृषी विभागाच्या विविध विस्तार सेवांशी जोडणे आणि त्याची अधिकृत नोंदणी करणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम २०२६ अंतर्गत महिला शेतकऱ्यांना अधिकृत मान्यता देण्याची तसेच त्यांचा अधिकृत डेटाबेस तयार करण्याची तरतूद केली आहे,                   या उपक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ स्वतःच्या नावावर जमीन असलेल्या महिलांपुरते प्रमाणपत्र मर्यादित राहणार नाही प्रत्यक्ष शेती करणाऱ्या तसेच शेतीशी संबंधित विविध कामांमध्ये क...

नेहरू युवा मंडळ चाहुरवाडी "आध्यात्मिक जोड आणि निसर्ग संवर्धनाचा..!!"पर्यावरणपूरक देखावा

Image
नेहरू युवा मंडळ चाहुरवाडी यांनी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदा "आध्यात्मिक जोड आणि निसर्ग संवर्धनाचा..!!"अनोखा पर्यावरणपूरक देखावा तयार केला आहे. नेहरु युवा मंडळाचे यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे या देखाव्याच्या माध्यमातून श्री गणेश मंदिरात अवतरले  श्री शंकर भगवान यांचे वहाण नंदी महाराज पाण्याची गंगा नंदीच्या मुखातून अवतरल्याचा भास होतो.  निर्झर, धबधबा, झाडे वेली फुले, पशू, पक्षी, चिमण्या, घरटी छोट्याशा जागेत निसर्गच अवतरला आहे. असा भास होतो.  संपूर्ण देखावा  म्हणजे आपल्या संस्कृती मध्ये सुर्य, चंद्र, झाडे🌲🌳🌴🌲🌳🌴 पर्वत प्राणी,  घरटी शेती  आणि पाऊस या सारख्या निसर्गातील घटकांना विशेष महत्त्व आहे. हा देखावा म्हणजे जीवन सृष्टी, निसर्ग पुजा, आणि सामुदायिक जीवनाचे प्रतिबिंब आहे.  निसर्ग हा केवळ आपल्या गरजा  भागवत नाही तर तो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे.  पृथ्वी ही पंचमहाभूते मिळून बनलेली आहे. निसर्ग टिकला तरच आपला टिकाव आहे. या देखाव्यातून साकारण्यात आली आहे.  या देखाव्याचे कला दिग्दर्शन  अमित पवार, सुधीर जगदाळे, विवेक लोहार...

ढेबेवाडी विभागात 'सेवा संकल्प अभियाना'स नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Image
  तळमावले/राजेंद्र पुजारी यांचेकडून पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील पानेरी, तळमावले आणि मंद्रूळ कोळे या परिसरात नुकतेच 'सेवा संकल्प अभियान' आणि 'विशेष मतदार नोंदणी अभियान' मोठ्या उत्साहात राबवण्यात आले. प्रशासकीय सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने राबवलेल्या या मोहिमेला ग्रामस्थांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मोहिमेदरम्यान सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय श्री. संतोष पाटील , पाटणचे प्रांताधिकारी श्री. सोपान टोम्पे , आणि तहसीलदार श्री. अनंत गुरव यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विविध उपक्रमांची पाहणी केली आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मोहिमेतील प्रमुख उपक्रम व वाटप: महसूल सेवा व दाखले: पानेरी येथे नागरिकांना रेशन कार्ड, सातबारा उतारे तसेच विविध ७ प्रकारचे आवश्यक दाखले तात्काळ वितरित करण्यात आले. वारस फेरफार व सातबारा वाटप: प्रलंबित वारस नोंदींचा निपटारा करत मंद्रूळ कोळे येथील पात्र वारसांना सातबारा व फेरफार उताऱ्यांचे वाटप करण्यात आले. विशेष लाभ: दिव्यांग बांधव तसेच भटक्या-विमुक्त जमातींच्या नागरिकांसाठी विशेष लाभ वाट...