Posts

" कुछ भी नही रहता दुनिया मे, लोगो रह जाती है दोस्ती i जिंदगी का नाम दोस्ती दोस्ती का नाम जिंदगी "

Image
डॉ.नितीन बेलागडे /ढेबेवाडी                      प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संकटे येतात अडचणीही येतात त्यावेळी त्याला गरज असते ती आधाराची  आणि तो आधार देण्याचे काम खऱ्या अर्थाने मित्र करत असतो.                "कुछ भी नही रहता दुनिया मे, लोगो रह जाती है दोस्ती" आणि म्हणून मित्रांचे स्थान आपल्या आयुष्यात महत्त्वाचे असते.  स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आपण सर्व शाळेतील मित्र एकत्र आलो आहोत संकटाच्या काळात आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. कुठलाही भेद न ठेवता सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका प्रमुखांनी जपली पाहिजे. अशी भूमिका प्रसाद जानुगडे यांनी स्नेहसंमेलनाच्या व्यासपीठावरुन मांडली.                30 वर्षांपूर्वी  १९९६ इयत्ता दहावी शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. चाळीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते ढेबेवाडी येथील कर...

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या मुंबई विभाग युवक अध्यक्षपदी संतोष कदम यांची नियुक्ती

Image
तळमावले/वार्ताहर छत्रपती संभाजी राजे यांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या मुंबई विभाग युवक अध्यक्षपदी संतोष कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे मुंबई, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यातील संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाचे उपाध्यक्ष अंकुश बाबा कदम, सरचिटणीस धनंजय जाधव यांच्या स्वाक्षरीने नियुक्ती करण्यात आली.

संविधान उद्देशिका भेट देऊन नव दांम्पत्याला शुभेच्छा

Image
तळमावले/वार्ताहर                पाटण तालुक्यातील चाळकेवाडी (कुंभारगांव) येथे सौ.सविता आणि आप्पासोा निवडूंगे यांची कन्या अक्षता आणि सुनील सावंत यांचे चिरंजीव अक्षय यांचा साखरपुडा शनिवार दि.17 मे, 2025 रोजी उत्साहात संपन्न झाला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून या नवदांम्पत्याला शुभाशीर्वाद दिले. शुभेच्छा देताना अनेकांनी अक्षता आणि अक्षय यांना भेटवस्तू म्हणून फ्रेम, बुके दिले.               मात्र यामध्ये रयत विद्यार्थी विचार मंचचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण यांनी आणलेल्या संविधान उदे्दशिकेच्या फ्रेमने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय देसाई, पाटण तालुका बाजार समितीचे उपसभापती विलास गोडांबे, माजी उपसभापती रमेश मोरे, माजी पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, नानासाहेब सावंत, शिवाजी सुर्वे, प्रा.ए.बी.कणसे, चंद्रकांत चाळके, अशोक माटेकर, डाॅ.दिलीपराव चव्हाण, चंद्रकांत काजारी, प्रवीण निवडूंगे, मारुती निवडूंग...

मोरणा शिक्षण संस्थेची उज्वल निकालांची परंपरा कायम

Image
पाटण :                 माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रु मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे 100% निकाल,न्यू इंग्लिश स्कूल, गोकुळ -धावडे 100% निकाल,न्यू इंग्लिश स्कूल, नाटोशी 100% निकाल तसेचहा वत्सलादेवी इंग्लिश मीडियम स्कूल दौलतनगर 100 % निकाल लागला असून विशेष म्हणजे संस्थेच्या सर्व शाखांचे 100%   निकाल लागले असून सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण प्राप्त केलेले आहेत,                 सर्व गुणवंत,यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मा.ना.श्री. शंभूराज देसाई साहेब,मंत्री पर्यटन ,खणीकर्म, माजी सैनिक कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा  व मा. श्री.रविराज देसाई दादा,अध्यक्ष मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी, मा. श्री. यशराज देसाई दादा,चेअरमन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना दौलतनगर,  मा.ॲड. जयराज देसाई दादा, मा.आदित्यराज देसाई दादा,संस्थेचे उपाध्यक्ष श्री.विलास कुराडे ,संस्थेचे...

युवा वर्गाला योग्य दिशा देण्याचे काम धनंजय भाऊ नक्कीच करतील - संतोष कदम

Image
मुंबई/प्रतिनिधी                     सामजिक चळवळीत काम करत असताना चळवळीला व युवकांना योग्य दिशा द्यायची असेल तर अर्थ कारणाची जोड हवीच अशी धनंजय जाधव भाऊ यांची भुमिका होती फक्त बोलून न थांबता धनंजय भाऊंनी सर्व जातीधर्माच्या महामंडळाना एका छताखाली आणत रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करून देण्याचं काम केलं. एकमेव असा नेता आहे जो कार्यक्रमाला आलेल्या नामवंत उद्योजकांना साद घालत आपल्या युवकांना रोजगार स्वयंरोजगार द्या माझ्या सोबत असणाऱ्या माणसाच्या हातात दगड नाही तर रोजगार देण्याचं काम करायचं आहे. अशी प्रामाणिक भूमिका असणारा माणूस व सामजिक जान असणारा बांधिलकी जपणारा व गांभीर्य असणारा नेता . लवकरच युवकांसाठी उद्योगाच्या चाव्या युवकांना देऊन अनेक उद्योजक घडवण्याचे काम नक्कीच करतील असा ठाम विश्वास आहे.  असे मत महाराष्ट्र स्वराज्य पक्ष राज्य कार्यकारीणी सदस्य संतोष कदम यांनी मांडले.

रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष हे ॲक्शन मोडवर

Image
कराड/वार्ताहर                     बोगस व टाळा करणाऱ्या वाहन विमा कंपन्यांवर ती कारवाई करण्याची मागणी रयत विद्यार्थी विचार मंचचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण यांनी केलेली आहे. त्याचबरोबर कराड उत्तरेस असलेलं बांधकाम कामगार ऑफिस मध्ये लोकांची प्रचंड प्रमाणामध्ये गैरसोय होताना पाहायला मिळालेली छोटसं ऑफिस असल्यामुळे ऑफिसमध्ये तुंबळ गर्दी होत आहे. पिण्याचे पाणी नाही, शौचालय नाही, लोकांना बसण्याची व्यवस्था नाही,  सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी ऑफिस शिफ्टिंग करण्यात यावा अशी मागणी अक्षय चव्हाण यांनी केली आहे. जनता मालक आहे आणि तुम्ही जनतेचे सेवक आहात जनतेची सेवा करण्याची तुमचे कर्तव्य आहे अशा परिस्थितीमध्ये संबंधित स्टाफ लोकांशी गैरवर्तवणूक करताना पाहायला मिळालेला आहे. याचा जाब विचारता अक्षय चव्हाण यांनी तहसीलदार सो कराड कल्पना ढवळे व उप पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी सिद्धेश पाटील, महेश जिरंगे, अनिल कदम, चंद्रकांत कदम सर्व पदाधिकारी उपस्थित होते

शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाचे एन.एम.एम.एस.परीक्षेत सुयश

Image
 पाटण -                  राष्ट्रीय आर्थिकदृष्टया मागास शिष्यवृत्ती परीक्षा डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेचा नुकताच अंतरिम निकाल लागला असून मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयातील एन.एम.एम.एस.राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक विद्यार्थीनी कु.तिकुडवे सान्वी दिनकर ही विद्यार्थीनी  सातारा जिल्ह्यात गुणवत्ता यादीत १७वी आली आहे. तसेच  विद्यालयातील  सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी कु.चव्हाण वैष्णवी काशिनाथ, पाटील राजवर्धन सूर्यकांत, शेजवळ ललित आनंदा, शेजवळ गणेश अरुण, कु.शेजवळ संस्कृती हणमंत, देसाई हर्षवर्धन कैलास, कुंभार हर्षवर्धन सर्जेराव, पानस्कर सार्थक निवास, माने अभय संदीप, पवार वेदांत शिवाजी, कु.शेजवळ श्रावणी सुहास, कु.शेजवळ रिया नितीन, कु.शेजवळ अनुष्का विजय, पाटील आर्यन बाबुराव, शेजवळ अर्थव प्रकाश, खांडेकर सुषमा संतोष या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे,                     या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन...