" कुछ भी नही रहता दुनिया मे, लोगो रह जाती है दोस्ती i जिंदगी का नाम दोस्ती दोस्ती का नाम जिंदगी "

डॉ.नितीन बेलागडे /ढेबेवाडी 

                प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संकटे येतात अडचणीही येतात त्यावेळी त्याला गरज असते ती आधाराची  आणि तो आधार देण्याचे काम खऱ्या अर्थाने मित्र करत असतो.

            "कुछ भी नही रहता दुनिया मे, लोगो रह जाती है दोस्ती" आणि म्हणून मित्रांचे स्थान आपल्या आयुष्यात महत्त्वाचे असते.  स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आपण सर्व शाळेतील मित्र एकत्र आलो आहोत संकटाच्या काळात आपण एकमेकांना मदत केली पाहिजे. कुठलाही भेद न ठेवता सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका प्रमुखांनी जपली पाहिजे. अशी भूमिका प्रसाद जानुगडे यांनी स्नेहसंमेलनाच्या व्यासपीठावरुन मांडली.

            30 वर्षांपूर्वी  १९९६ इयत्ता दहावी शिकत असलेल्या माजी विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. चाळीशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकांवरच्या मित्र-मैत्रिणी सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते ढेबेवाडी येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे  स्नेहसंमेलन येथील साई मंगल कार्यालय नुकतेच पार पडले या वेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

        यावेळी बोलताना प्रसाद जानुगडे  म्हणाले , "स्नेहसंमेलनाच्या औचित्य साधून आपण एकत्र आलो आहोत. सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची भूमिका प्रमुखांची असली पाहिजे. तिथं कुठलाही भेद नसला पाहिजे एकमेकांना आलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची भावना आपण जपली पाहिजे. आपल्या मित्र परीवारात जिव्हाळा आणि माणुसकीची किनार असली पाहिजे. चंगळवादी आणि चमकोगिरी विचारांना समाज कधीही स्थान देत नाही असे प्रखंड मतं त्यांनी  या वेळी व्यक्त केले.

        या वेळी बोलताना. पांडुरंग यादव म्हणाले, "वर्षानंतर सर्व विद्यार्थ्यांना पाहून निश्चित आनंद वाटला. सर्व विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात काम करत आहेत, याचा फायदा समाजातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना होण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचली पाहिजे  कर्मवीर अण्णांचा हा विचार सर्वांनी पुढे घेऊन जाण्यासाठी योगदान दिले पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दादासो साळुंखे म्हणाले, "शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच अशा स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली."

        सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून देताना शाळेतल्या गमतीजमती सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. विद्या पाटील यांनी आपल्या कवितेतून स्नेहसंमेलनातील त्या वातावरणात  रंग भरण्याचा प्रयत्न केला . यावेळी टाळ्यांनी संपूर्ण हॉल दणाणून गेला होता. एडवोकेट कविता पन्हाळे, स्वाती जंगम, सचिन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मित्र मैत्रिणींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडण्यासाठी जितेंद्र कुंभार, सुनील ढेब, हमु आतार, प्रसाद जानुगडे, दादासो साळुंखे, गणेश पाटील प्रयत्न केले. क्रार्यक्रमात डॉ.नितीन बेलागडे, सचिन पन्हाळे, सचिन शिंदे, कविता पन्हाळे यांनी  वेगवेगळ्या हिंदी गितांच सादरीकरण करीत सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाग्यवान साखरे यांनी केले. सूत्रसंचालन तुळशीराम सुतार यांनी केले.


Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न