युवा वर्गाला योग्य दिशा देण्याचे काम धनंजय भाऊ नक्कीच करतील - संतोष कदम
मुंबई/प्रतिनिधी
सामजिक चळवळीत काम करत असताना चळवळीला व युवकांना योग्य दिशा द्यायची असेल तर अर्थ कारणाची जोड हवीच अशी धनंजय जाधव भाऊ यांची भुमिका होती फक्त बोलून न थांबता धनंजय भाऊंनी सर्व जातीधर्माच्या महामंडळाना एका छताखाली आणत रोजगार व स्वयंरोजगार निर्माण करून देण्याचं काम केलं. एकमेव असा नेता आहे जो कार्यक्रमाला आलेल्या नामवंत उद्योजकांना साद घालत आपल्या युवकांना रोजगार स्वयंरोजगार द्या माझ्या सोबत असणाऱ्या माणसाच्या हातात दगड नाही तर रोजगार देण्याचं काम करायचं आहे. अशी प्रामाणिक भूमिका असणारा माणूस व सामजिक जान असणारा बांधिलकी जपणारा व गांभीर्य असणारा नेता . लवकरच युवकांसाठी उद्योगाच्या चाव्या युवकांना देऊन अनेक उद्योजक घडवण्याचे काम नक्कीच करतील असा ठाम विश्वास आहे. असे मत महाराष्ट्र स्वराज्य पक्ष राज्य कार्यकारीणी सदस्य संतोष कदम यांनी मांडले.

Comments
Post a Comment