रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष हे ॲक्शन मोडवर
कराड/वार्ताहर
बोगस व टाळा करणाऱ्या वाहन विमा कंपन्यांवर ती कारवाई करण्याची मागणी रयत विद्यार्थी विचार मंचचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष अक्षय चव्हाण यांनी केलेली आहे. त्याचबरोबर कराड उत्तरेस असलेलं बांधकाम कामगार ऑफिस मध्ये लोकांची प्रचंड प्रमाणामध्ये गैरसोय होताना पाहायला मिळालेली छोटसं ऑफिस असल्यामुळे ऑफिसमध्ये तुंबळ गर्दी होत आहे. पिण्याचे पाणी नाही, शौचालय नाही, लोकांना बसण्याची व्यवस्था नाही, सर्व सोयी सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी ऑफिस शिफ्टिंग करण्यात यावा अशी मागणी अक्षय चव्हाण यांनी केली आहे. जनता मालक आहे आणि तुम्ही जनतेचे सेवक आहात जनतेची सेवा करण्याची तुमचे कर्तव्य आहे अशा परिस्थितीमध्ये संबंधित स्टाफ लोकांशी गैरवर्तवणूक करताना पाहायला मिळालेला आहे. याचा जाब विचारता अक्षय चव्हाण यांनी तहसीलदार सो कराड कल्पना ढवळे व उप पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी सिद्धेश पाटील, महेश जिरंगे, अनिल कदम, चंद्रकांत कदम सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Comments
Post a Comment