शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयाचे एन.एम.एम.एस.परीक्षेत सुयश

 पाटण -  

            राष्ट्रीय आर्थिकदृष्टया मागास शिष्यवृत्ती परीक्षा डिसेंबर २०२४ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेचा नुकताच अंतरिम निकाल लागला असून मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयातील एन.एम.एम.एस.राष्ट्रीय शिष्यवृत्ती धारक विद्यार्थीनी कु.तिकुडवे सान्वी दिनकर ही विद्यार्थीनी  सातारा जिल्ह्यात गुणवत्ता यादीत १७वी आली आहे. तसेच  विद्यालयातील  सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी कु.चव्हाण वैष्णवी काशिनाथ, पाटील राजवर्धन सूर्यकांत, शेजवळ ललित आनंदा, शेजवळ गणेश अरुण, कु.शेजवळ संस्कृती हणमंत, देसाई हर्षवर्धन कैलास, कुंभार हर्षवर्धन सर्जेराव, पानस्कर सार्थक निवास, माने अभय संदीप, पवार वेदांत शिवाजी, कु.शेजवळ श्रावणी सुहास, कु.शेजवळ रिया नितीन, कु.शेजवळ अनुष्का विजय, पाटील आर्यन बाबुराव, शेजवळ अर्थव प्रकाश, खांडेकर सुषमा संतोष या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे,

                या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे   विद्यालयाच्या उपशिक्षिका व स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख  कु.मणेर एस.एस., श्री.डोंगरे एस.एस. श्री.कदम आर.एन.या शिक्षकानी मार्गदर्शन केले.

                या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्हयाचे पालकमंत्री माननीय नामदार श्री शंभूराज देसाई साहेब, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.श्री. यशराज देसाई दादा,युवा नेते जयराज देसाई दादा, आदित्यराज देसाई दादा, लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशन चे सचिव श्री.एन.एस.कुंभार सर संस्थेचे उपाध्यक्ष श्री.विलास कुराडे,सचिव श्री.डी.एम.शेजवळ सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल.केंडे सर सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, शाळा व्यवस्थापन समिती सर्व पदाधिकारी व आजी माजी विद्यार्थी यांनी सर्व यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न