Posts

डाकेवाडीच्या अमृताने खाकी वर्दीचं स्वप्न सत्यात उतरवलं

Image
तळमावले/वार्ताहर जिद्द, चिकाटी, योग्य नियोजन आणि इच्छाशक्ती असेल तर डोंगराएवढया संकटांना भेदून यशाला गवसणी घालणे शक्य होते. आपल्या अंगावर खाकी वर्दी असावी असं स्वप्न अमृता डाकवेने काॅलेजला असताना पाहिलं आणि ते पूर्ण देखील केले. या तरुणीने मिळवलेले यश कौतुकास पात्र असेच आहे. कारण घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना तिने अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर पोलीस भरतीमध्ये यश मिळवत खाकी वर्दीचं स्वप्न तिने सत्यात उतरवलं आहे. डाकेवाडी (काळगांव) येथील अमृता तानाजी डाकवे यांनी मुंबई पोलीस भरतीमध्ये प्रतिकूल परिस्थितीत अविश्रांत अभ्यास करत यश संपादन केले. घरातील आर्थिक परिस्थिती बेताचीच असलेल्या अमृता हिची आई सौ.अलका आणि वडील तानाजी शेतीची कामे करत अमृताच्या शिक्षणासाठी सातत्याने प्रयत्न केले. शेतामध्ये कष्ट करत या दोघांनी त्यांच्या कुटूंबाचा उदरर्विाह केला आहे. त्याचबरोबर दोघांनी अमृताला मानसिक आणि आर्थिक पाठबळ दिले. अमृतानेही आपल्या आईवाडीलांच्या प्रामाणिक कष्टाची जाणीव ठेवत अभ्यास व सराव केला त्यांना घरच्या कामात मदत केली आणि पोलीस भरतीमध्ये यश मिळवले. या यशाबद्दल स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीन...

कौतुकाच्या थापेमुळे काम करण्याची प्रेरणा मिळते - तृप्ती देसाई

Image
तळमावले/वार्ताहर                 कौतुुकाच्या शाबासकीच्या थापेमुळे काम करण्याची प्रेरणा मिळते. चंद्रभागा रुरल डेव्हलपर व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य (कार्यक्षेत्र ऑल इंडिया) सातारा जिल्हा यांच्या वतीने घेण्यात आलेेल्या पुरस्कार वितरण सोहळा कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन बिग बॉस फेम तृप्ती देसाई यांनी काढले. त्या यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर चंद्रभागा रुरल डेव्हलपरचे चेअरमन दीपक शेठ लोखंडे, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर, काँग्रेसचे युवा नेते इंद्रजीत चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश अभिनेत्री सुनंदा शेंडे, पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे ,संतोष थोरवडे,पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील , व अन्य मान्यवर उपस्थित होते. चांगल्या कामाचे कौतुक झाले पाहिजे. कौतुकामुळे व्यक्तीला आणखी काम करण्याची ऊर्जा आणि उर्मी मिळते असेही देसार्ई पुढे बोलताना म्हणाल्या.           एका चांगल्या का...

सह्याद्री वॉरियर्स करिअर अकँडमी व के.सी.कॉलेजचे यश

Image
तळमावले/वार्ताहर     सह्याद्री वॉरियर्स करिअर अकँडमी व के.सी.कॉलेज, तळमावले ता पाटण (MOU'S - सामंजस्य करार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र ) के.से.कॉलेज, तळमावले ता पाटण मध्ये शिकत असलेले विद्यार्थी  महाराष्ट्र पोलीस (मुंबई ,पालघर व पुणे), प्रवीण राउत पालघर पोलीस] तनुजा आचरे, मुंबई पोलीस, अमृता डाकवे मुंबई पोलीस, सौ.अश्विनी कोळगे-करपे पुणे ग्रामीण पोलीसमध्ये भरती झाले आहेत.           या विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन करणारे के.सी.कॉलेजचे कुशल मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉ अरूण गाडे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा डॉ विक्रांत सुपूगडे, अकँडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शिवराज पाटील, अकँडमीचे प्रशिक्षक पै.प्रफुल्ल पाटील (NIS, Coach) सर्वांनी योग्यवेळी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थांच्या आयुष्याला योग्य दिशा देऊन विद्यार्थ्यांनी देखील चिकाटी, प्रयत्न, कष्ट करून आपल्या आयुष्याचं सोनं केलं.  या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल  स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे, संस्थेच्या ...

धामणीच्या अंगणवाडी सेविका नंदाताई सावंत यांचा आदिशक्ती पुरस्काराने सन्मान

Image
तळमावले/वार्ताहर            सातारा जिल्ह्यातील उद्योगलक्ष्मी, वीरपत्नी-वीरमाता, आदिशक्ती व कृषीलक्ष्मी क्षेत्रातील कर्तृत्वान, प्रतिभावान आणि राज्याला गौरव प्राप्त करून देणाऱ्या महिलांचा खासदार श्रीनिवास पाटील फाउंडेशन व Yuva 360° च्या वतीने सन्मान व गुणगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला .             कोरोना काळात घरोघरी जाता येत नव्हते . अशा परिस्थितीत सुध्दा  सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या काळगांव बीट धामणी गावच्या अंगणवाडी सेविका नंदाताई यशवंत सावंत यांचा आदिशक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला .               कोरोना काळात नियमांचे पालन करुन लोकांच्या तब्बेतीची देखभाल , युनिसेफचे विक्रमशिला यांनी  ICDS च्या माध्यमांतून केलेली अंकूर स्थापना, सुजाण पालकत्व, वयोगट 3 ते 6 या मुलांना दररोज  व्हॉट्स अप द्वारे गाणी, गोष्टी, खेळ  पाठवणे, त्यामुळे पालकांना सुध्दा आवड निर्माण झाली. पालक सांभाळकर्ते न बनता आधारकर्ते झाले. यामुळे मुलांचा श...

कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) म्हणजे वात्सल्य, माया जणू चंद्राची शितल छाया

Image
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांना त्यांच्या प्रत्येक राजकीय ,  सामाजीक , शैक्षणिक कार्यात हातभार लावणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी कै . सौ . वत्सलादेवी देसाई  ( ताईसाहेब )  यांची   64 वी पुण्यतिथी बुधवार दि .  २०  मे  २०२ 3 रोजी महाराष्ट्र शासनाने उभारलेल्या  “ महाराष्ट्र दौलत ”  लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना . शंभूराज देसाईसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत   संपन्न होत आहे कै . सौ . वत्सलादेवी देसाई  ( ताईसाहेब )  म्हणजे वात्सल्य ,  ममता ,  माया जणू चंद्राची शितल छायाच होत्या .  त्यांचे 64 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने.....               पाटण तालुक्यातील मरळीच्या इनामदार घराण्यातील कुलदिपक महाराष्ट्राचे पोलादी पुरुष ,  लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी अनेक आपत्तींना तोंड देवून आपल्या ध्येयाप्रत अत्यंत निष्ठेने आणि निकराने तोंड दिले .  म्हणूनच ते महाराष्ट्र...

मालदन येथील बैलगाडी शर्यतीत देवराज पाटील यांच्या गाडीने पटकावला प्रथम क्रमांक

Image
  सणबूर/वार्ताहर       मालदन ता.पाटण येथे हर्षवर्धन काळे यांच्या स्मरणार्थ .ग्रामस्थ मंडळ मालदन व वजीर ग्रुपने आयोजित केलेल्या भव्य बैलगाडी शैर्यतीत. देवराज पाटील यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय क्रमांक भैरवनाथ प्रसन्न तांबवे, तृतीय क्रमांक नगरसेवक हणमंतराव जाधव आगाशिवनगर, चतुर्थ क्रमांक अंबिका प्रसन्न , पाचवा क्रमांक निखील दादा पवार बेलवडे खुर्द पाटण यांच्या गाडीने पटकावला.         प्रथम क्रमांकाचे बक्षीस ३१ हजार हर्षवर्धन काळे यांच्या स्मरणार्थ यशवंत काळे यांच्याकडून, द्वितीय क्रमांकाचे २५ हजार बक्षीस रघुनाथ धोंडीबा बोत्रे यांच्या स्मरणार्थ शशिकांत बोत्रे.यांचेकडून, तृतीय क्रमांकाचे २० हजार बक्षीस सुरेश काळे एम.डी पाटील सूर्यकांत काळे यांच्याकडून, चतुर्थ क्रमांकाचे १५ हजार बक्षीस नितीन काळे, पाचवे ११ हजार बक्षीस राजेश साळुंखे, यांच्याकडून देण्यात आले. तर जयदीप अजितराव पाटील यांच्या स्मरणार्थ संदीप पाटील, तसेच स्वाती संतोष देसाई यांच्या स्मरणार्थ चैतन्य उद्योग समुह तळमावले यांच्याकडून आकर्षक ढाली देण्यात आल्या.  ...

जि.प.शाळा यादववाडीस गिरगांवकर प्रतिष्ठानच्या वतीने मदत

Image
ढेबेवाडी/वार्ताहर         मंद्रुळकोळे खुर्द ता.पाटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यादववाडी  या शाळेस शाळेचे माजी विद्यार्थी संजय देसाई यांनी गिरगावकर प्रतिष्ठानच्या वतीने शाळेस सर्व रंगकाम करण्यासाठी साहित्य दिले.         रंग दे माझी शाळा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी शाळेस गिरगाव प्रतिष्ठानच्या (मुंबई) वतीने रंगकाम व्हावे यासाठी संजय देसाई यांनी प्रयत्न केले होते त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि गिरगाव प्रतिष्ठानने रंग कामाचे साहित्य दिले नुकतेच हे साहित्य जगन्नाथ जानूगडे सर यांच्याकडे वितरित करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच संजय लोहार, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हा. चेअरमन दादासाहेब साळुंखे,तंटामुक्ती अध्यक्ष, रविराज भुरुगडे उपस्थित होते. जगन्नाथ जानूगडे यांनी स्वागत करून आभार मानले.