मालदन येथील बैलगाडी शर्यतीत देवराज पाटील यांच्या गाडीने पटकावला प्रथम क्रमांक
मालदन ता.पाटण येथे हर्षवर्धन काळे यांच्या स्मरणार्थ .ग्रामस्थ मंडळ मालदन व वजीर ग्रुपने आयोजित केलेल्या भव्य बैलगाडी शैर्यतीत. देवराज पाटील यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला, द्वितीय क्रमांक भैरवनाथ प्रसन्न तांबवे, तृतीय क्रमांक नगरसेवक हणमंतराव जाधव आगाशिवनगर, चतुर्थ क्रमांक अंबिका प्रसन्न , पाचवा क्रमांक निखील दादा पवार बेलवडे खुर्द पाटण यांच्या गाडीने पटकावला.
प्रथम क्रमांकाचे बक्षीस ३१ हजार हर्षवर्धन काळे यांच्या स्मरणार्थ यशवंत काळे यांच्याकडून, द्वितीय क्रमांकाचे २५ हजार बक्षीस रघुनाथ धोंडीबा बोत्रे यांच्या स्मरणार्थ शशिकांत बोत्रे.यांचेकडून, तृतीय क्रमांकाचे २० हजार बक्षीस सुरेश काळे एम.डी पाटील सूर्यकांत काळे यांच्याकडून, चतुर्थ क्रमांकाचे १५ हजार बक्षीस नितीन काळे, पाचवे ११ हजार बक्षीस राजेश साळुंखे, यांच्याकडून देण्यात आले. तर जयदीप अजितराव पाटील यांच्या स्मरणार्थ संदीप पाटील, तसेच स्वाती संतोष देसाई यांच्या स्मरणार्थ चैतन्य उद्योग समुह तळमावले यांच्याकडून आकर्षक ढाली देण्यात आल्या.
ढेबेवाडी विभागातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत झाली. यामध्ये १२५ बैलगाड्याचा समावेश होता. बैलगाडी शैर्यत पाहण्यासाठी पाटण कराड तालुक्यातील लोकांनी मोठी गर्दी. केली.होती. झेंडापंच म्हणून संदीप माने धोत्रेवाडी यांनी काम पाहिले, समालोचक बबलू देसाई कोळे व श्रीकांत साबळे यांनी काम केले अजित काळे यांनी स्वागत केले. तर युवराज काळे यांनी आभार मानले.

Comments
Post a Comment