कौतुकाच्या थापेमुळे काम करण्याची प्रेरणा मिळते - तृप्ती देसाई

तळमावले/वार्ताहर 

            कौतुुकाच्या शाबासकीच्या थापेमुळे काम करण्याची प्रेरणा मिळते. चंद्रभागा रुरल डेव्हलपर व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य (कार्यक्षेत्र ऑल इंडिया) सातारा जिल्हा यांच्या वतीने घेण्यात आलेेल्या पुरस्कार वितरण सोहळा कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन बिग बॉस फेम तृप्ती देसाई यांनी काढले. त्या यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर चंद्रभागा रुरल डेव्हलपरचे चेअरमन दीपक शेठ लोखंडे, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर, काँग्रेसचे युवा नेते इंद्रजीत चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश अभिनेत्री सुनंदा शेंडे, पत्रकार ज्ञानेश्वर शेवाळे ,संतोष थोरवडे,पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील , व अन्य मान्यवर उपस्थित होते. चांगल्या कामाचे कौतुक झाले पाहिजे. कौतुकामुळे व्यक्तीला आणखी काम करण्याची ऊर्जा आणि उर्मी मिळते असेही देसार्ई पुढे बोलताना म्हणाल्या.
        एका चांगल्या कार्यक्रमास उपस्थित राहिले याचे मला समाधान वाटते आजचा पुरस्कार सोहळा स्तुत्य आहे पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन अशा शब्दात सुरेखा कुडची यांनी आपल्या भवना व्यक्त केल्या. उदयसिंह पाटील म्हणाले की, दिपक लोखंडे हा येवती भागातील होतकरू तरूण असून त्यांना चंद्रभागा रूरल डेव्हलपर च्या माध्यमातून स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे या कार्यक्रमासोबतच त्यानी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले असून ते कौतुकास्पद आहेत.
         यावेळी इंद्रजित चव्हाण व अन्य मान्यवर यांनी मनोगते व्यक्त केली दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. मान्यवरांच्या स्वागतानंतर डॉ. संदीप डाकवे यांनी संपादित केलेल्या स्पंदन एक्स्प्रेस या विशेषाकांचे प्रकाशन करण्यात आले.
        दरम्यान, दीपक लोखंडे आणि अपर्णा लोखंडे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्राप्त व्यक्तींना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्राची फ्रेम देवून गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर शेवाळे यांनी तर सुत्रसंचालन सुरेश जाधव सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघांचे आणि चंद्रभागा रूरल डेव्हलपर चे पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग