धामणीच्या अंगणवाडी सेविका नंदाताई सावंत यांचा आदिशक्ती पुरस्काराने सन्मान
सातारा जिल्ह्यातील उद्योगलक्ष्मी, वीरपत्नी-वीरमाता, आदिशक्ती व कृषीलक्ष्मी क्षेत्रातील कर्तृत्वान, प्रतिभावान आणि राज्याला गौरव प्राप्त करून देणाऱ्या महिलांचा खासदार श्रीनिवास पाटील फाउंडेशन व Yuva 360° च्या वतीने सन्मान व गुणगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला .
कोरोना काळात घरोघरी जाता येत नव्हते . अशा परिस्थितीत सुध्दा सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या काळगांव बीट धामणी गावच्या अंगणवाडी सेविका नंदाताई यशवंत सावंत यांचा आदिशक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला .
कोरोना काळात नियमांचे पालन करुन लोकांच्या तब्बेतीची देखभाल , युनिसेफचे विक्रमशिला यांनी ICDS च्या माध्यमांतून केलेली अंकूर स्थापना, सुजाण पालकत्व, वयोगट 3 ते 6 या मुलांना दररोज व्हॉट्स अप द्वारे गाणी, गोष्टी, खेळ पाठवणे, त्यामुळे पालकांना सुध्दा आवड निर्माण झाली. पालक सांभाळकर्ते न बनता आधारकर्ते झाले. यामुळे मुलांचा शारिरीक, बौद्धीक, सामाजीक, भावनिक व सर्वांगीण विकास झाला. तसेच पोषण ट्रॅकर चे कामकाज ही उत्कृष्ट केलेले आहे. या सर्वाची दखल घेऊन धामणी ता. पाटण येथील नंदाताई यशवंत सावंत यांचा आदिशक्ती पुरस्कार देऊन खासदार श्रीनिवास पाटील यांचे हस्ते मान्यवरांचे उपस्थितीत सन्मान करण्यात आला .
या खास सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून मा.खासदार श्री.श्रीनिवास पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.सारंग पाटील (बाबा), उपाध्यक्षा सौ रचनादेवी पाटील, कराड नगराध्यक्षा रोहिणीताई शिंदे, मलकापूर नगराध्यक्षा निलमताई येडगे, माई प्रतिष्ठान अध्यक्षा संगिताताई साळुंखे, माजी नगराध्यक्षा शारदाताई जाधव, माजी नगराध्यक्षा अॅड. विद्याराणी साळुंखे, माजी नगराध्यक्षा अर्चनाताई पाटील, माजी नगराध्यक्षा प्रा . उमाताई हिंगमिरे, कराड गटविकास अधिकारी मीनाताई साळुंखे, पाटण गटशिक्षणाधिकारी दिपाताई बोरकर, माजी सभापती पाटण उज्वलाताई जाधव, माजी सभापती कराड फरीदाताई इनामदार, मल्हारपेठ सरपंच धनश्रीताई कदम आदि मान्यवर उपस्थित होते.


Comments
Post a Comment