सह्याद्री वॉरियर्स करिअर अकँडमी व के.सी.कॉलेजचे यश

तळमावले/वार्ताहर

    सह्याद्री वॉरियर्स करिअर अकँडमी व के.सी.कॉलेज, तळमावले ता पाटण (MOU'S - सामंजस्य करार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र ) के.से.कॉलेज, तळमावले ता पाटण मध्ये शिकत असलेले विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस (मुंबई ,पालघर व पुणे), प्रवीण राउत पालघर पोलीस] तनुजा आचरे, मुंबई पोलीस, अमृता डाकवे मुंबई पोलीस, सौ.अश्विनी कोळगे-करपे पुणे ग्रामीण पोलीसमध्ये भरती झाले आहेत.
        या विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन करणारे के.सी.कॉलेजचे कुशल मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य डॉ अरूण गाडे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा डॉ विक्रांत सुपूगडे, अकँडमीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शिवराज पाटील, अकँडमीचे प्रशिक्षक पै.प्रफुल्ल पाटील (NIS, Coach) सर्वांनी योग्यवेळी मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थांच्या आयुष्याला योग्य दिशा देऊन विद्यार्थ्यांनी देखील चिकाटी, प्रयत्न, कष्ट करून आपल्या आयुष्याचं सोनं केलं. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्य सौ शुभांगीताई गावडे, संस्थेचे सहसचिव प्रशासन प्राचार्य डॉ राजेंद्र शेजवळ, संस्थेचे सहसचिव अर्थ प्राचार्य गवळी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, कॉलेजचे कुशल प्रशासक प्राचार्य डॉ अरूण गाडे तसेच वांग खोर्यातील मान्यवर मंडळीने देखील तोंड भरून कौतुक केले व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग