जि.प.शाळा यादववाडीस गिरगांवकर प्रतिष्ठानच्या वतीने मदत
ढेबेवाडी/वार्ताहर
मंद्रुळकोळे खुर्द ता.पाटण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यादववाडी या शाळेस शाळेचे माजी विद्यार्थी संजय देसाई यांनी गिरगावकर प्रतिष्ठानच्या वतीने शाळेस सर्व रंगकाम करण्यासाठी साहित्य दिले.
रंग दे माझी शाळा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी शाळेस गिरगाव प्रतिष्ठानच्या (मुंबई) वतीने रंगकाम व्हावे यासाठी संजय देसाई यांनी प्रयत्न केले होते त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि गिरगाव प्रतिष्ठानने रंग कामाचे साहित्य दिले नुकतेच हे साहित्य जगन्नाथ जानूगडे सर यांच्याकडे वितरित करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच संजय लोहार, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हा. चेअरमन दादासाहेब साळुंखे,तंटामुक्ती अध्यक्ष, रविराज भुरुगडे उपस्थित होते. जगन्नाथ जानूगडे यांनी स्वागत करून आभार मानले.

Comments
Post a Comment