कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) म्हणजे वात्सल्य, माया जणू चंद्राची शितल छाया
महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांना त्यांच्या प्रत्येक राजकीय, सामाजीक,शैक्षणिक कार्यात हातभार लावणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची 64 वी पुण्यतिथी बुधवार दि. २० मे २०२3 रोजी महाराष्ट्र शासनाने उभारलेल्या “महाराष्ट्र दौलत” लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाईसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) म्हणजे वात्सल्य, ममता, माया जणू चंद्राची शितल छायाच होत्या. त्यांचे 64 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने.....
पाटण तालुक्यातील मरळीच्या इनामदार घराण्यातील कुलदिपक महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांनी अनेक आपत्तींना तोंड देवून आपल्या ध्येयाप्रत अत्यंत निष्ठेने आणि निकराने तोंड दिले. म्हणूनच ते महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयसिंहासनावरचे अनिभिषीक्त सम्राट बनले. याच सर्व श्रेय आहे.ते त्यांच्या धर्मपत्नी, सहचारिणी आणि लोकनेतेसाहेब यांना प्रत्येक राजकीय,सामाजीक, शैक्षणिक कार्यात हातभार लावणाऱ्या कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांच. निपाणी जवळच्या बेनाडीच्या कोल्हापूरच्या छत्रपतींच्या क्षात्रजगतगुरुच्या कन्या वत्सलादेवी यांच्याकरीता त्यांचे वडीलांनी कोल्हापुरच्या प्रागणांत चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारं एक राजबिंड स्वरुप मनोमन हेरुन ठेवले होते.ते म्हणजे महाराष्ट्राचे लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब. लोकनेतेसाहेबांनी आपल्या बुध्दीमत्तेच्या चुणकेवर अमोघ कर्तृत्वावर साऱ्या कोल्हापूरातील जनतेबरोबरच प्रत्यक्ष राजर्षी शाहू महाराजांचे लक्ष वेधून घेतले होते.बेन्नाडीकरांच्या लक्ष्मीनं मरळीकर देसाईंच्या उंबरठ्यावर ठेवलेंल धान्यांच माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलानं गृहप्रवेश करावा असे राजर्षी शाहू महाराजांनी मनोमन ठरविले होते.त्यांनी त्यांची ही इच्छा पुर्ण केली.
महाराष्ट्र राज्याचा प्रपंच उभारणारे आपले महत्वकांक्षी पती यांना कै.ताईसाहेब यांनी घरप्रपंच्यात कधीच अडकून ठेवले नाही. लोकनेतेसाहेबांनी कै.ताईसाहेबांच्या पाठींब्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर आपल्या कुशल बुध्दीमत्तेने राज्य केलं. लोकनेतेसाहेबांच्या व ताईसाहेबांच्या संसारवेलीवर सहा मुले आणि एक मुलगी अशी सहा फुले उमलली होती. आपल्या वडिलांच्या प्रमाणे तीही यशस्वी झाली. लोकनेतेसाहेबांनी राजकारणाच्या उलाढालीतून आपल्या मुलांकडे लक्ष देत ताईसाहेबांनी मुलांना मोठ करीत वडिलांप्रमाणे कर्तृत्ववान बनविले, जयसिंगराव, अशोकराव, शिवाजीराव, अरुणराव, शरदराव आणि मंगलाताई या सर्वांनी लोकनेतेसाहेब व ताईसाहेबांचे नाव उज्वल केले ते या त्यांच्यावरील संस्कारामुळे.
राज्य मंत्रीमंडळात १९५७ ला मंत्री म्हणून विराजमान झालेले लोकनेतेसाहेब महाराष्ट्राच्या अमोल कोंदणात रत्नाप्रमाणे चमकू लागले.लोकनेतेसाहेब यांच्याबरोबर संसार करताना ताईसाहेबांनी गोरगरीबांची सेवा करुन अनेकांचे संसार सुखी केले. नावातच वात्सल्य असणाऱ्या वात्सल्यमुर्ती ताईसाहेबांची पुण्याई आणि भक्ती यामुळेच लोकनेतेसाहेब यांनी प्रगतीची अनेक शिखरे गाठली हे आजही कोणी विसरले नाही.कर्तृत्ववान पुरुषामागे एक कर्तृत्ववान स्त्री असते हे ताईसाहेबांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले.
लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून ना.शंभूराज देसाईसाहेब यांच्या संकल्पनेतून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) यांची पुण्यतिथी २० मे रोजी साजरी करण्यात येत असून लोकनेतेसाहेब व कै.ताईसाहेब यांचे नातू राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना. शंभूराज देसाईसाहेब यांनी आपल्या आज्जी कै.ताईसाहेब यांच्या आदर्श विचारांनी त्यांच्या कार्याचे स्मरण रहावे याकरीता त्यांच्या नावाने गत दहा वर्षापासून पाटण मतदारसंघातील गरीब व गरजू कुटूबांतील मुलींना महाविद्यालयीन शिक्षण घेण्याकरीता आर्थिकतेअभावी अडचण येवू नये याकरीता कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना सुरु करुन या मुलींचे पालकत्व घेतले आहे. आज या शिष्यवृत्तीचा मतदारसंघातील सुमारे 179 हुन अधिक गरीब मुलींना याचा फायदा मिळत असून कै.सौ.वत्सलादेवी देसाई (ताईसाहेब) शिष्यवृत्ती योजना गरजू मुलींकरीता एक आधार म्हणून काम करीत आहे. कै.ताईसाहेब यांच्या आर्शिवादानेच ना.शंभूराज देसाई हे आपले आजोबा लोकनेतेसाहेब यांच्याप्रमाणे राज्याच्या गृह खात्याचे मंत्री म्हणून उल्लेखनीय कार्य करीत आहेत. कै.ताईसाहेब यांचे 64 व्या पुण्यस्मरण दिनानिमीत्ताने पाटण मतदारसंघातील तमाम जनतेच्या वतीने कै.ताईसाहेब यांना विनम्र अभिवादन.

Comments
Post a Comment