Posts

डाकेवाडी येथे श्री दुर्गामाता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न

Image
तळमावले/वार्ताहर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील आणि श्री नूतन सेवा मंडळ आणि श्री त्रिमूर्ती सार्वजनिक उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला श्री दुर्गामाता मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दोन दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात बुधवारी दुपारी माताजींच्या भव्य मिरवणुकीने झाली. या मिरवणुकीत परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर सायंकाळी गणपती पूजन, पुण्याह वाचन, देवतार्पण आणि अग्नी स्थापना करण्यात आली. श्री दुर्गामाता मूर्तीस जलाधिवास व धान्याधिवास हे विधी शास्त्रोक्त पद्धतीने पार पडले. गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून स्थापित देवता पूजन, होम-हवन आणि वास्तू होम पार पडले. सकाळी १० वाजता मंत्रोच्चाराच्या जयघोषात श्री दुर्गामाता मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली, तर सकाळी ११ वाजता मंदिराचे कलशारोहण संपन्न झाले. दुपारी श्री दुर्गामातेची महापूजा, आरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारच्या सत्रात महिलांस...

अ. भा. बेळगाव मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी प्रा. यशवंत पाटणे

Image
तळमावले/प्रतिनिधी           अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, बेळगाव आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. यशवंत पाटणे यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन रविवार, दि. २४ रोजी मराठा मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरीत पार पडणार आहे.           प्रा. पाटणे हे महाराष्ट्रातील प्रभावी वक्ते आणि साहित्यिक म्हणून परिचित आहेत. ‘सहावे सुख’, ‘चैतन्याचे चांदणे’ आणि ‘जगाच्या कल्याणा’ यांसारखी त्यांची अनेक पुस्तके वाचकप्रिय ठरली आहेत. शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कारासह विविध सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.           संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात पुण्याचे शिवव्याख्याते यशवंत गोसावी यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज : आजच्या काळातील गरज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच तिसऱ्या सत्रात कव...

धनावडेवाडी येथे १९ मेला १७ वा भव्य 'श्री साई भंडारा' उत्सव

Image
ढेबेवाडी/वार्ताहर तालुक्यातील धनावडेवाडी (निगडे) येथे ओम साई अशोक मित्र मंडळाच्या वतीने १७ व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या भव्य 'श्री साई भंडारा' उत्सवाचे आयोजन मंगळवार, दिनांक १९ मे २०२६ रोजी करण्यात आले आहे. या सोहळ्यात दिवसभर विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मेजवानी भाविकांना मिळणार आहे. या उत्सवाचा प्रारंभ सकाळी ८ वाजता होम-हवन आणि सत्यनारायण महापूजेने होणार असून सकाळी ११ वाजेपर्यंत हे धार्मिक विधी पार पडतील. त्यानंतर दुपारी १२ ते २ या वेळेत परिसरातील महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता श्री साईनाथांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीने संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होणार आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत महाप्रसादाचे (भंडारा) वाटप करण्यात येईल. रात्री ७ वाजता 'ओम साई भजन मंडळ, धनावडेवाडी निगडे' यांच्या सुस्वर भजनाचा कार्यक्रम संपन्न होईल. भजनानंतर रात्री ८ वाजता महिलांसाठी विशेष 'होम मिनिस्टर' स्पर्धा आणि ८:३० वाजता लहान मुलांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे ख...

कवी दिलीप पवार यांना 'महाराष्ट्र साई पद्मश्री' पुरस्कार प्रदान

Image
तळमावले/वार्ताहर ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित, राष्ट्रीय पातळीवरील 'महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार २०२६' चा सोहळा नुकताच शिर्डी येथील श्री साईबाबांच्या पावनभूमीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्यात पाटण तालुक्यातील काळगाव येथील कवी दिलीप पवार यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'महाराष्ट्र साई पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शनिवार, दिनांक ०२ मे २०२६ रोजी शिर्डी येथील परिवार लॉन्स बँकेट हॉलमध्ये हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व साईबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते कवी दिलीप पवार यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याचे यशस्वी नियोजन संस्थापक अध्यक्ष सुदाम संसारे, उपाध्यक्षा विद्या ठाकूर, कार्याध्यक्ष संजय मोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केले होते. कवी दिलीप पवार यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे काळगाव परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून, त्यांचे सर्व स्तरा...

कु.सिद्धी काळे या विद्यार्थिनीस स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक जाहीर

Image
  तळमावले/वार्ताहर काळगांव (ता.पाटण) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 10 वी मध्ये मुलींच्या विभागात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल कु.सिद्धी विकास काळे या विद्यार्थिनीस सन 2026 चे स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक जाहीर केल्याची माहिती शेतीमित्र डॉ.संदीप डाकवे यांनी दिली. या पारितोषिकाचे स्वरूप रोख रक्कम रु.1,000/-, सन्मानपत्र आणि तात्या पुस्तक असे आहे. चिमुकली सांची डाकवे हिच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डाकवे परिवारातर्फे दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो. सांचीच्या नावे असलेल्या ठेवपावतीच्या व्याजातून दरवर्षी एका गुणवंत विद्यार्थिनीला हे पारितोषिक दिले जाते. यापूर्वी हे पारितोषिक कु.सानिका पाटील आणि वैष्णवी पाटील या विद्यार्थिनींना मिळाले आहे. डाकवे परिवाराने शैक्षणिक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी ज्ञानाची शिदोरी, माणुसकीच्या वहया, एक वही एक पेन, गणवेश वाटप, शाळेला तक्ते वितरण, विनामुल्य बोलक्या भिंती, महापुरुषांच्या प्रतिमांचे वितरण, गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जावून सत्कार, स्वाध्यायमाला वितरण, दिव्यांग मुलांना चित्रकला साहित्य वाटप, इ.उपक्रम राबवले आहेत.  यापूर्वी सांचीच्य...

तळमावले येथे ३ मे रोजी 'माजी विद्यार्थी स्नेहमेळावा' व 'बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार' वितरण सोहळा

Image
तळमावले (प्रतिनिधी): येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित काकासाहेब चव्हाण कॉलेजच्या माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने भव्य 'माजी विद्यार्थी स्नेहमेळावा' आणि 'शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे कृतज्ञता पुरस्कार' वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता महाविद्यालयीन परिसरात संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत मा. प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे भूषविणार आहेत. यावेळी संस्थेच्या सचिव डॉ. उषदेवी साळुंखे, प्राचार्य डॉ. डी. पी. कांबळे, प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील, ॲड. भरत पाटील (नाना) यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमादरम्यान शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृतींना उजाळा देत, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा 'कृतज्ञता पुरस्...

औदार्य शिवालय फाउंडेशन’ या कार्यालयाचे दिमाखात उद्घाटन

Image
तळमावले/वार्ताहर      समाजकल्याण आणि आरोग्य सेवेचा पवित्र वसा घेऊन कार्यरत असणाऱ्या औदार्य शिवालय फाउंडेशन च्या नवीन कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ गुरुवार दि.19 मार्च,2026 रोजी मस्करवाडी (काळगांव), ता.पाटण येथे अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला.  ‘सेवा, समर्पण आणि समाजकल्याण’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून या फाउंडेशनने ग्रामीण भागातील जनतेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विशेषतः दुर्गम आणि ग्रामीण भागातील नागरिकांना शहरासारख्या उच्च दर्जाच्या नेत्र सेवा माफक दरात किंवा मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस फाउंडेशनने याप्रसंगी बोलून दाखवला. यावेळी फाउंडेशनचे प्रेरणास्थान माणिकराव काळे, मार्गदर्शक नारायण उपरे, खजिनदार कमलेश मस्कर, संचालक गणेश मोरे, शुभांगी देसाई, कोमल होगले उपस्थित होते. या कार्यक्रमाचे निमंत्रक आणि फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष लक्ष्मण मारुती मस्कर, उपाध्यक्ष शिवाजी गणपती मस्कर आणि सचिव चंद्रकांत किसन मस्कर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी पं.स.सदस्य पंजाबराव देसाई, कराडचे उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, काळगांव ग्रामपंचायतच्या सरपंच राखी...