कवी दिलीप पवार यांना 'महाराष्ट्र साई पद्मश्री' पुरस्कार प्रदान

तळमावले/वार्ताहर

ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित, राष्ट्रीय पातळीवरील 'महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार २०२६' चा सोहळा नुकताच शिर्डी येथील श्री साईबाबांच्या पावनभूमीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्यात पाटण तालुक्यातील काळगाव येथील कवी दिलीप पवार यांना त्यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'महाराष्ट्र साई पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शनिवार, दिनांक ०२ मे २०२६ रोजी शिर्डी येथील परिवार लॉन्स बँकेट हॉलमध्ये हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व साईबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते कवी दिलीप पवार यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्याचे यशस्वी नियोजन संस्थापक अध्यक्ष सुदाम संसारे, उपाध्यक्षा विद्या ठाकूर, कार्याध्यक्ष संजय मोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केले होते. कवी दिलीप पवार यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे काळगाव परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून, त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

याप्रसंगी डॉ. माधव वानखेडे, भूषण सरदार, राजनंदिनी अहिरे, कविता वडनेरकर यांच्यासह अनेक मान्यवर, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग