Posts

रयत चा विद्यार्थी म्हणजे एक ब्रँड- श्री इंद्रजीत देशमुख

Image
पाचवड/वार्ताहर                     रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136 वी जयंती महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड या रयत शैक्षणिक संकुलात उत्साहात पार पडली. याप्रसंगी प्रमुख  पाहुणे  माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख साहेब उपस्थित होते. रयतचा विद्यार्थी  आत्मविश्वासने सर्व सर्व क्षेत्रात चमकला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.                     कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भैय्यासाहेब जाधवराव यांनीही कर्मवीरांच्या जीवनातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले तसेच रयत सेवक श्री. पी.एम. काटकर यांनी विद्यार्थ्यांनी नेहमी चांगले काम करणाऱ्याच्या यादीत आपले नाव असावे असे वर्तन ठेवावे असे प्रतिपादन केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री लावंड टी.एस. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे मॅडम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.        ...

येळेवाडी येथे रक्तदान शिबीरास प्रतिसाद

Image
काळगांव/वार्ताहर पाटण तालुक्यातील येळेवाडी (काळगांव) येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. श्री महालक्ष्मी ब्लड सेंटर, कराड, जय बजरंग गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मंडळ येळेवाडी यांच्या वतीने हे शिबीर आयोजित केले होते. सुमारे 28 रक्तदात्यांनी यात रक्तदान केले. सचिन आत्माराम येळवे, सचिन सुरेश येळवे, शैलेश शिवाजी येळवे, गणेश किसन निवडूंगे, आकाश नारायण गडूगले, विवेक तुळशीराम जाधव, रोहन रमेश मस्कर, गणेश विलास येळवे, विनायक दत्तात्रय येळवे, अनिकेत अशोक जाधव, सुनिल शिवाजी जाधव, प्रथमेश अशोक जाधव, निलेश  विठ्ठल शेंडे, राकेश पाटील (काळगाव), दिनेश विजय येळवे, सुनील सदाशिव मस्कर, सागर महादेव मस्कर, प्रशांत पांडुरंग मस्कर, राहुल शिवाजी येळवे, सतीश बाबुराव येळवे, विलास महादेव येळवे, प्रवीण बाबुराव येळवे, महेश लक्ष्मण येळवे, साहिल किसन येळवे इ.नी रक्तदान केले. जय बजरंग मंडळाच्या वतीने नेहमीच विधायक उपक्रम राबवले जातात. यंदा राबवलेल्या रक्तदान शिबीराचे परिसरातून कौतुक होत आहे.

जय हनुमान संस्थेकडून महिलांचा असाही सन्मान

Image
तळमावले /वार्ताहर मान्याचीवाडी (कुंभारगांव) ता.पाटण येथील जय हनुमान सामाजिक संस्था गेल्या काही वर्षापासून समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी सर्वांना परिचित आहे. परिसरामध्ये या संस्थेेने आपल्या कार्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यंदा त्यांनी पाहुण्या आलेल्या महिलांना मोफत औदुंबर दर्शन घडवून आणले आहे. गणेशोत्सवामध्ये 2 दिवस पाहुण्या म्हणून आलेल्या गौराईचा आपण मोठया आनंदाने उत्साहाने मानसन्मान करतो मग आपल्या घरी राबवणाऱ्या गौराईचा सन्मान व्हावा ही सद्भावना मनामध्ये ठेवून जय हनुमान संस्थेकडून खास महिलांसाठी श्री क्षेत्र औदुंबर येथे मोफत यात्रा घडवून आणली आहे. यामध्ये 100 पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. संस्थेच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  जय हनुमान या संस्थेने गणपतीची मिरवणूक देखील अत्यंत पारंपारिक पध्दतीने काढली होती. या मिरवणूकीला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आरेवाडी येथील श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प.रामदास महाराज आणि ह.भ.प.मधुकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली लहान वारकरी यांनी टाळ, मृदूंग आणि नामाच्या गजरात काढलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली. तसेच ...

माईंगडेवाडी येथे आरोग्य शिबीराचे आयोजन

Image
तळमावले/वार्ताहर प्रति वर्षाप्रमाणे माईंगडेवाडीचा राजा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 20 सप्टेंबर रोजी ढेबेवाडी पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचा शुभारंभ झाला. या आरोग्य शिबिराचा परिसरातील लोकांनी लाभ घेतला अनेक युवकांनी रक्तदान ही केले सामाजिक हेतू डोळ्यासमोर ठेवून मंडळांनी प्रतिवर्षी आरोग्य शिबिराच्या आयोजन केलेले असते‌. कोरोना महामारी काळात राबवलेल्या उपक्रमामुळे येथील मंडळाचे चर्चेत आले आहे. मुंबईकर सर्व ग्रामस्थ गणेश उत्सव काळात गावाकडे घेऊन सामाजिक उपक्रम राबवत  असतात.पर्यावरण पूरक गणेश उत्सव त्याचबरोबर उत्कृष्ट मंडळ म्हणून ही मंडळ कार्यरत आहे. या आरोग्य शिबिरास तज्ञ डॉक्टर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली  श्री गणेश कृपा सेवा मंडळ माईंगडेवाडी मंडळाच्या कार्याचे प्रचंड कौतुक होत आहे

नितीन पाटील स्टार आयकाॅन पुरस्काराने सन्मानीत

Image
तळमावले/वार्ताहर महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन आणि भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा स्टार आयकाॅन पुरस्कार शिवसमर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे  नितीन पाटील यांना डाॅ.आण्णासाहेब डांगे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत, सम्राट महाडीक, डाॅ.राजीव लोहार व अन्य मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी नितीन पाटील यांच्या समवेत रमेश पाटील, आशिष थोरात, विकास शिरसट, उत्तम धर्मे, अक्षय पाटील व अन्य उपस्थित होते. शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अँड.जनार्दन बोत्रे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शिवसमर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तळमावले च्या माध्यमातून अल्पावधीतमध्ये उद्योग क्षेत्रात नावारुपास येणारे आदर्श युवा उद्योजक म्हणून नितीन पाटील यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.   बांधकाम क्षेत्रात सातत्याने नवनवीन उपक्रम राबवून नितीन पाटील यांनी आपली कार्यसिध्दता दर्शवली आहे. उद्योगाचे माध्यमातून अनेक युवकांना रोजगाराची साधने उपलब्ध करुन त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्हयासह विविध परिसरात पाटील यांनी आदर्श उ...

काळगाव विद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंतीचा सोहळा उत्साहात

Image
काळगांव/वार्ताहर                  रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज काळगाव. विद्यालयामध्ये पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंतीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. परंपरेनुसार कर्मवीरांच्या प्रतिमेची मिरवणूक सजवलेल्या बैलगाडीतून काढण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. कांबळे ए.पी.सर, ज्येष्ठ शिक्षिका सौ.जाधव एम.एस. व सर्व सेवकवृंद व ग्रामस्थ यांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व सौ.लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.                 मुख्याध्यापक ए.पी. कांबळे यांच्या हस्ते गाडीमधील प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपरिक पद्धतीने निघालेल्या मिरवणुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळा, शेतकरी तसेच सर्व प्रांतातील विविध वेशभूषा केल्या होत्या. मिरवणुकी दरम्यान ठीकठिकाणी ग्रामस्थ महिलांनी कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन केले. काळगाव व भरेवाडी या दोन ठिकाणी झांज पथक, लेझीम पथक व टिपरी...

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आचरेवाडी विद्यालयाचे घवघवीत यश

Image
ढेबेवाडी/वार्ताहर       न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज आचरेवाडी या विद्यालयाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत विविध खेळांच्या प्रकारात घवघवीत यश संपादन केले असून आचरेवाडी विद्यालयाने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला आहे.        पाटण येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत मैदानी क्रीडा प्रकारात  विद्यालयातील खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले.14 वर्षे वयोगटात प्रणव सुरेश सूर्यवंशी याने 200मीटर व 400 मीटर धावणे स्पर्धेत प्रथम,19 वर्षे वयोगटात ओमकार दगडू कदम 3000 मीटर धावणे मध्ये प्रथम, तर भालाफेक द्वितीय, समिक्षा दिनकर पवार हिने 19 वर्ष वयोगटात 3000 धावणे स्पर्धेत प्रथम व सायली अनिल साबळे व्दितीय लक्ष्मी संजय कुंभार 19 वर्षे वयोगटात गोळाफेक सपर्धेत तृतीय, समीक्षा पवार उंच उडी तृतीय, 19 वर्ष वयोगटत सांघिक 4×400 मीटर रिले प्रथम यामध्ये सहभागी खेळाडू यश कृष्णा टेटमे, संस्कार शंकर गुंडगे, प्रथमेश बाजीराव कळंबे, अनिकेत पोपट मस्कर, रामदास लक्ष्मण डाकवे , 19 वर्षे वयोगट(मुली) सांघिक 4×400 मीटर रिले प्रथम सहभागी खेळाडू...