Posts

श्लोक डिसले यास प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड जाहीर

Image
  तळमावले/वार्ताहर महाराष्ट्र शासन, धर्मादाय आयुक्त कार्यालय संलग्न आणि आंतरराष्ट्रीय आयएसओ मानांकन प्राप्त पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने देण्यात येणारा प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड माईंगडेवाडी, (जिंती) येथील श्लोक लव डिसले यांना जाहीर झाला असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष संदीप डाकवे यांनी दिली आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ आणि कोल्हापूरी फेटा असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार दि.25 ऑक्टोबर, 2025 रोजी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. इ.5वी मध्ये शिकत असलेल्या श्लोक डिसले याने जय जय स्वामी समर्थ, काव्यांजली, निवेदिता माझी ताई, पिंगा ग पोरी पिंगा या मालिका,  व्हॅनिश ॲड, शासकीय जाहिरात, झीबा बासमती राईस इ.जाहिराती, राक्षस, शक्तिमान मुले युक्तिमान, मातृत्व, रामायण, खेळ नाटकाचा इ.नाटके, कूटनीती, दृष्टिकोन, वाचाल तर वाचाल, पत्रास कारण की इ.शॉर्ट फिल्म्स मध्ये अभिनय केला आहे. कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमात स्व.राजाराम डाकवे (तात्य...

पाटण तालुका शासकीय योगासन स्पर्धेत श्री लक्ष्मीदेवी हायस्कूल कुंभारगांव या विद्यालयाने 6 सुवर्णपदक मिळवून केला भीमपराक्रम

Image
तळमावले/अनिल देसाई यांचेकडून  2025 -26 च्या पाटण तालुका शासकीय योगासन स्पर्धा कै. सुलोचनाबाई पाटणकर कन्या शाळा, पाटण येथे संपन्न झाल्या. स्पर्धेचा शुभारंभ शिवप्रेमी, क्रीडा मार्गदर्शक श्री मनोहर यादव सर, पाटण तालुका क्रीडा समन्वयक श्री नितीन घाडगे, श्री तानाजी पवार आणि पाटण शहर रोटरी  क्लबचे सन्माननीय अध्यक्ष व सदस्य तसेच 14 वर्षाखालील मुलींच्या गटात आर्टिस्टिक पेअर प्रकारात कुमारी सेजल बोबडे व मानसी बागल, श्री लक्ष्मीदेवी हायस्कूल कुंभारगांव यांचा प्रथम क्रमांक आला. 17 वर्षाखालील मुलांच्या गटात ट्रॅडिशनल योगासन प्रकारात कुमार विघ्नेश नारायण मोरे याचा प्रथम क्रमांक, 17 वर्षाखालील मुलांच्या गटात आर्टिस्टिक पेअर प्रकारात कुमार विघ्नेश नारायण मोरे व साईराज पुजारी यांचा प्रथम क्रमांक, 17 वर्षाखालील मुलींच्या गटात आर्टिस्टिक पेअर प्रकारात कुमारी हर्षदा शंकर  माटेकर व अपूर्वा सागर चव्हाण यांचा प्रथम क्रमांक , 17 वर्षाखालील मुलींच्या  गटात ट्रॅडिशनल योगासन प्रकारात कुमारी अपूर्वा सागर चव्हाण हिचा प्रथम क्रमांक आला. लक्ष्मीदेवी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती मोहन ...

स्व.राजाराम डाकवे (तात्या) निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

Image
  तळमावले/वार्ताहर                     पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फुर्त आणि उदंड प्रतिसाद मिळाला. वडिलांविषयी फारसं कोणी लिहित नाही म्हणून त्यांच्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्या भावना एकत्र करण्यासाठी या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. यावेळी ट्रस्टचे मार्गदर्शक प्रा.ए.बी.कणसे, उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव रेश्मा डाकवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.                     स्वाती पांडूरंग कुंभार (वाळी-पुणे), गायत्री यशवंत चाळके, आत्माराम जाधव (सुपने-पुणे) यांना अनुक्रमे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक देण्यात आला आहे. डाॅ.राजेश जोशी (सातारा), जितेंद्र शंकर चौधरी (वाई)...

येवती येथील जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळाने घडवले एकीचे दर्शन

Image
उंडाळे/वार्ताहर                     येवती ता. कराड येथील जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळ  हे गेल्या 33  वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना   राबवणारे या परिसरातील एकमेव मंडळ आहे .  या  मंडळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंडळामध्ये सर्व जाती धर्मातील युवक वर्ग,आबाल वृद्ध ,महिला मंडळ  हे सर्व सर्वजण  एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहाने आनंदाने  साजरा करतात.यावर्षी देखील सामाजिक बांधिलकी जपत मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या संख्येने सामाजिक उपक्रम राबवले जातात,                      यामध्ये सामाजिक शैक्षणिक, धार्मिक,सांस्कृतिक, आरोग्य विषयक यासारख्या  विविध  उपक्रमांचे   आयोजन करण्यात येते  .विशेष बाब म्हणजे  या मंडळाने येवती गावामध्ये    ग्रामस्थांच्या सहकार्यातून गणपतीचे  कायमस्वरूपी सुंदर असे मंदिरच उभे केले आहे त्यामुळे परिसरातील  गणेश भक्त मोठ्या संख्येने दर संकष्टी चतुर्थील...

उपक्रमशील कलाशिक्षक बाळासाहेब कचरे यांचा सेवानिवृत्ती गौरव सत्कार समारंभ

Image
पाचवड/वार्ताहर                  महात्मा गांधी विद्यालयातील उपक्रमशिल शिक्षक श्री.बाळासाहेब कचरे हे रयत शिक्षण संस्थेतील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृ्त्त झाले.या कार्यक्रमास रयतचे माध्यमिक विभागाचे सहसचिव श्री.बी.एन.पवार साहेब अध्यक्षस्‍थानी होते. तर श्री.रविंद खंदारे साहेबउपशिक्षणाधिकारी प्राथमिक व प्रदीप कुंभार, सुवर्ण पदक विजेते, पॅरा रनर मुंबई हे प्रमुख अतिथी होते. विद्यार्थी कलेच्या चळवळीसाठी व रयतेच्या विविध उपक्रमात  सरांनी आपले बहुमोल योगदान दिले आहे.असे मत श्री.बीड.एन.पवार यांनी व्यक्त केले.सेवानिवृत्ती निमित्त कचरे सरांनी आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठांन्न भोजन दिले तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी बंधूना संपूर्ण पोशाख देत अध्यक्ष पवार साहेबांच्या हस्ते सन्मानीत केले.या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी पत्रकार व संपादक राहूल ताटे ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत कांबीरे, प्रा.रविंद्र खोत यांची विशेष मनोगते झाली.                असंख्य नातेवाईक, मान्यवर, रयत व रयत बाहेरील कलाशिक्...

माणुसकीचा ‘दीपस्तंभ’ -प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे (सर)

Image
आदरणीय प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे (सर) आणि माझी प्रथम भेट कधी झाली ते आता नीटसे आठवत नाही. साधारणपणे सन 2006 च्या सुमारास मी सरांच्या वाणी आणि लेखणीच्या प्रेमात पडलो. सरांच्या आणि माझ्या जवळ येण्याचा एक धागा म्हणजे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.पाटील (आबा). आबांची एकंदरीत वाटचाल मला प्रेरणादायी वाटली म्हणून मी त्यांचे ‘आबा’ या शब्दातून आणि फक्त ठिपक्यातून चित्र रेखाटले होते. ती चित्रे आदरणीय सरांनी आबांना फॅक्स व्दारे मंत्रालयात पाठवली होती. त्यावेळी आबांनी ‘मला या मुलाला भेटायला आवडेल’ असा शब्द दिला. सरांचे आणि माझे नाते जुळले ते यामुळेच. मला चित्रकला या छंदाबरोबर ‘पत्रमैत्री’चा छंद आहे. मी सरांना अनेक पत्रे पाठवली. त्यावर प्रतिक्रिया देताना सर फोन करायचे त्यावेळी माझी बोलताना कसरत व्हायची. कारण सरांचे शाब्दीक सौंदर्याने, उपमांनी नटलेेले शब्द मला मंत्रमुग्ध करायचे. 28 जुलै, 2006 रोजी सरांनी पाठवलेले पत्र माझ्या ‘पत्रमैत्री’ छंदातील अनमोल ठेवा आहे.  सन 2007 रोजीच्या आमच्या ‘शिवसमर्थ’ या दिवाळी अंकातील आदरणीय सरांनी लिहलेली ‘कृतज्ञता’ ही कथा इ.6 वीच्या बालभारतीच्या पाठयप...

ना.शंभूराज देसाई यांचे हस्ते तळमावले स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न

Image
दौलतनगरदि .26:-  ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी राज्यातील महायुतीचे शासन प्रयत्नशील असून सातारा जिल्हयामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासारख्या चांगल्या योजना राबविण्याचे काम आपण पालकमंत्री म्हणून केले. त्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघातील  9 प्राथमिक आरोग्य केंद्रांचा या योजनेमध्ये समाविष्ठ करत या स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचे कामांसाठी निधीची तरतूद करुन या कामांना प्राथमिकता दिली. सातारा जिल्हयाचा पालकमंत्री म्हणून शिक्षण,आरोग्य व पाणी पुरवठा या तीन गोष्टींना प्राधान्य दिलं. त्याचाच एक भाग म्हणून आज तळमावले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पुरविण्यात आलेल्या विविध सेवा सुविधांचा लोकार्पण सोहळा होत असून स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामधून ग्रामीण भागामध्ये दर्जेदार आरोग्याच्या सुविधा मिळतील असा विश्वास पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.             तळमावले,ता.पाटण येथे जिल्हा वार्षिक आराखडयांतर्गत मंजूर स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र...