उपक्रमशील कलाशिक्षक बाळासाहेब कचरे यांचा सेवानिवृत्ती गौरव सत्कार समारंभ
पाचवड/वार्ताहर
महात्मा गांधी विद्यालयातील उपक्रमशिल शिक्षक श्री.बाळासाहेब कचरे हे रयत शिक्षण संस्थेतील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृ्त्त झाले.या कार्यक्रमास रयतचे माध्यमिक विभागाचे सहसचिव श्री.बी.एन.पवार साहेब अध्यक्षस्थानी होते. तर श्री.रविंद खंदारे साहेबउपशिक्षणाधिकारी प्राथमिक व प्रदीप कुंभार, सुवर्ण पदक विजेते, पॅरा रनर मुंबई हे प्रमुख अतिथी होते. विद्यार्थी कलेच्या चळवळीसाठी व रयतेच्या विविध उपक्रमात सरांनी आपले बहुमोल योगदान दिले आहे.असे मत श्री.बीड.एन.पवार यांनी व्यक्त केले.सेवानिवृत्ती निमित्त कचरे सरांनी आपल्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठांन्न भोजन दिले तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी बंधूना संपूर्ण पोशाख देत अध्यक्ष पवार साहेबांच्या हस्ते सन्मानीत केले.या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी पत्रकार व संपादक राहूल ताटे ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत कांबीरे, प्रा.रविंद्र खोत यांची विशेष मनोगते झाली.
असंख्य नातेवाईक, मान्यवर, रयत व रयत बाहेरील कलाशिक्षक, सेवानिवृत्त माजी शिक्षक तसेच सातऱ्यातील अनेक रंगकर्मी, कलाकार, पत्रकार मान्यवर यांनी उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्य मुल्ला यांनी केलेतर आभार सौ.मोकाशी यांनी व्यक्त केले. सुत्रसंचालन सौ.साधना पाटोळे, सौ.मयुरी बर्गे व श्री.शिवाजी जंगम यांनी केले.
Comments
Post a Comment