पाटण तालुका शासकीय योगासन स्पर्धेत श्री लक्ष्मीदेवी हायस्कूल कुंभारगांव या विद्यालयाने 6 सुवर्णपदक मिळवून केला भीमपराक्रम
तळमावले/अनिल देसाई यांचेकडून
2025 -26 च्या पाटण तालुका शासकीय योगासन स्पर्धा कै. सुलोचनाबाई पाटणकर कन्या शाळा, पाटण येथे संपन्न झाल्या. स्पर्धेचा शुभारंभ शिवप्रेमी, क्रीडा मार्गदर्शक श्री मनोहर यादव सर, पाटण तालुका क्रीडा समन्वयक श्री नितीन घाडगे, श्री तानाजी पवार आणि पाटण शहर रोटरी क्लबचे सन्माननीय अध्यक्ष व सदस्य तसेच 14 वर्षाखालील मुलींच्या गटात आर्टिस्टिक पेअर प्रकारात कुमारी सेजल बोबडे व मानसी बागल, श्री लक्ष्मीदेवी हायस्कूल कुंभारगांव यांचा प्रथम क्रमांक आला. 17 वर्षाखालील मुलांच्या गटात ट्रॅडिशनल योगासन प्रकारात कुमार विघ्नेश नारायण मोरे याचा प्रथम क्रमांक, 17 वर्षाखालील मुलांच्या गटात आर्टिस्टिक पेअर प्रकारात कुमार विघ्नेश नारायण मोरे व साईराज पुजारी यांचा प्रथम क्रमांक, 17 वर्षाखालील मुलींच्या गटात आर्टिस्टिक पेअर प्रकारात कुमारी हर्षदा शंकर माटेकर व अपूर्वा सागर चव्हाण यांचा प्रथम क्रमांक , 17 वर्षाखालील मुलींच्या गटात ट्रॅडिशनल योगासन प्रकारात कुमारी अपूर्वा सागर चव्हाण हिचा प्रथम क्रमांक आला. लक्ष्मीदेवी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती मोहन कराळे, क्रीडा शिक्षक श्री करपे सर, श्री घोरपडे एस के, श्री कुंभार डी. जे ,श्री महाबळ ए.पी. श्री कांबळे. एस जी .सौ .मुल्ला. ए.एफ श्री पाटील. मामा तसेच शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी विद्यार्थ्याना शुभेच्या दिल्या आणि शाळेचे कौतुक केले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment