येवती येथील जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळाने घडवले एकीचे दर्शन
उंडाळे/वार्ताहर
येवती ता. कराड येथील जय महाराष्ट्र गणेश विकास मंडळ हे गेल्या 33 वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवणारे या परिसरातील एकमेव मंडळ आहे . या मंडळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंडळामध्ये सर्व जाती धर्मातील युवक वर्ग,आबाल वृद्ध ,महिला मंडळ हे सर्व सर्वजण एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करतात.यावर्षी देखील सामाजिक बांधिलकी जपत मंडळाच्या वतीने दरवर्षी मोठ्या संख्येने सामाजिक उपक्रम राबवले जातात,
यामध्ये सामाजिक शैक्षणिक, धार्मिक,सांस्कृतिक, आरोग्य विषयक यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते .विशेष बाब म्हणजे या मंडळाने येवती गावामध्ये ग्रामस्थांच्या सहकार्यातून गणपतीचे कायमस्वरूपी सुंदर असे मंदिरच उभे केले आहे त्यामुळे परिसरातील गणेश भक्त मोठ्या संख्येने दर संकष्टी चतुर्थीला,या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेत असतात.
या मंडळामध्ये साधारण 300 सभासद असून यामधील काहीजण पुणे ,मुंबई या ठिकाणी कामानिमित्त वास्तव्यास आहेत ,मात्र ते दरवर्षी गणेशोत्सवासाठी आवर्जून उपस्थित राहून एकत्र येऊन हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतात . या मंडळाचा आदर्श इतर गावातील मंडळांनीही घेतल्यास त्यांच्या गावात देखील एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यास मदत होईल
Comments
Post a Comment