Posts

ग्रामीण कथाकार पांडूरंग काशिनाथ पतंगे यांचे निधन

Image
तळमावले/वार्ताहर कुंभारगांव (ता.पाटण) येथील पांडूरंग काशिनाथ पतंगे यांचे बुधवार दि.18 ऑक्टोबर, 2023 रोजी निधन झाले. त्यांचे वय 83 वर्षे होते. ‘आप्पा’ या नावाने ते परिसरात परिचित होते. पांडूरंग या स्वतःच्या नावातील ‘रंग’ आणि वडिलांच्या काशिनाथ या नावातील ‘नाथ’ हा शब्द असे ‘रंगनाथ’ पतंगे या नावाने ते लेखन करीत होते. रंगनाथ पतंगे हे उत्कृ ग्रामीण कथा लिहीत. कुंभारगांव येथे झालेल्या साहित्य संमेलनात त्यांचा गौरव झाला होता. नामवंत दिवाळी अंकामधून त्यांच्या कथा प्रसिध्द झाल्या होत्या. परिसरातील अनेक दिवाळी अंकांना ते विनामूल्य कथा देत असत. त्यांच्या लेखनाचा एक वाचक वर्ग तयार झाला होता. त्यांच्या अनेक कथांना विविध पारितोषिके मिळाली आहेत. त्यांची भाशाशैली काळजाला हात घालणारी अशी होती. जुन्या काळात घडलेल्या अनेक घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या कथांमधून वाचायला मिळत असे. गेले काही दिवसापासून ते आजारी होते. परंतू त्यांचा लिहण्याचा व्यासंग प्रचंड होता. 200 पेक्षा जास्त कथा त्यांनी लिहल्या आहेत. आकाशवाणीवरही त्यांच्या लिखाणाचे वाचन झाले आहे.  कुंभारगांव येथे के.एन.पतंगे या नावाने त्यांनी कपडयाचा व्...

'झी टाॅकीज’ वर सादर होणार गुढे येथील काळंबादेवीची गाथा

Image
तळमावले/वार्ताहर                     पाटण तालुक्यातील वरची शिबेवाडी गुढे येथील नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या श्री काळंबादेवीची गाथा झी टाॅकीज या वाहिनीवर वर दिसणार आहे. झी टाॅकीज प्रस्तुत "गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा" या कार्यक्रमात नवरात्री विशेष मध्ये साध्वी अनुराधा दिदी यांचा कथा महोत्सव होत आहे. या मध्ये देवींची महती सांगितली जाणार आहे. निसर्गरम्य वातावरण असलेल्या श्री क्षेत्र शिबेवाडी येथील श्री काळंबादेवी मंदिर परिसरामध्ये नुकतेच झी टाॅकीजच्या टीमने चित्रीकरण केले आहे. या कार्यक्रमाचे निवेदन सुप्रसिध्द अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी केले आहे. शुभम प्रोडक्शन चे दिग्दर्शक हेमंत पांचाळ यांनी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले आहे. कीर्तनकार ह.भ.प.संगीताताई येनपुरे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केेले. विशेष म्हणजे झी टाॅकीजवर दिसणारा तळमावले हा पहिलाच कार्यक्रम आहे.                या कार्यक्रमाचे प्रक्षेपण झी टाॅकीज या वाहिनीवर शुक्रवार दि.13 ऑक्टोबर मंगळवार दि.24 ऑक...

रयत चा विद्यार्थी म्हणजे एक ब्रँड- श्री इंद्रजीत देशमुख

Image
पाचवड/वार्ताहर                     रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 136 वी जयंती महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज तसेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड या रयत शैक्षणिक संकुलात उत्साहात पार पडली. याप्रसंगी प्रमुख  पाहुणे  माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख साहेब उपस्थित होते. रयतचा विद्यार्थी  आत्मविश्वासने सर्व सर्व क्षेत्रात चमकला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले.                     कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भैय्यासाहेब जाधवराव यांनीही कर्मवीरांच्या जीवनातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले तसेच रयत सेवक श्री. पी.एम. काटकर यांनी विद्यार्थ्यांनी नेहमी चांगले काम करणाऱ्याच्या यादीत आपले नाव असावे असे वर्तन ठेवावे असे प्रतिपादन केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री लावंड टी.एस. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्राचार्या डॉ. मंजुश्री बोबडे मॅडम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.        ...

येळेवाडी येथे रक्तदान शिबीरास प्रतिसाद

Image
काळगांव/वार्ताहर पाटण तालुक्यातील येळेवाडी (काळगांव) येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. श्री महालक्ष्मी ब्लड सेंटर, कराड, जय बजरंग गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मंडळ येळेवाडी यांच्या वतीने हे शिबीर आयोजित केले होते. सुमारे 28 रक्तदात्यांनी यात रक्तदान केले. सचिन आत्माराम येळवे, सचिन सुरेश येळवे, शैलेश शिवाजी येळवे, गणेश किसन निवडूंगे, आकाश नारायण गडूगले, विवेक तुळशीराम जाधव, रोहन रमेश मस्कर, गणेश विलास येळवे, विनायक दत्तात्रय येळवे, अनिकेत अशोक जाधव, सुनिल शिवाजी जाधव, प्रथमेश अशोक जाधव, निलेश  विठ्ठल शेंडे, राकेश पाटील (काळगाव), दिनेश विजय येळवे, सुनील सदाशिव मस्कर, सागर महादेव मस्कर, प्रशांत पांडुरंग मस्कर, राहुल शिवाजी येळवे, सतीश बाबुराव येळवे, विलास महादेव येळवे, प्रवीण बाबुराव येळवे, महेश लक्ष्मण येळवे, साहिल किसन येळवे इ.नी रक्तदान केले. जय बजरंग मंडळाच्या वतीने नेहमीच विधायक उपक्रम राबवले जातात. यंदा राबवलेल्या रक्तदान शिबीराचे परिसरातून कौतुक होत आहे.

जय हनुमान संस्थेकडून महिलांचा असाही सन्मान

Image
तळमावले /वार्ताहर मान्याचीवाडी (कुंभारगांव) ता.पाटण येथील जय हनुमान सामाजिक संस्था गेल्या काही वर्षापासून समाजोपयोगी उपक्रम राबवण्यासाठी सर्वांना परिचित आहे. परिसरामध्ये या संस्थेेने आपल्या कार्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यंदा त्यांनी पाहुण्या आलेल्या महिलांना मोफत औदुंबर दर्शन घडवून आणले आहे. गणेशोत्सवामध्ये 2 दिवस पाहुण्या म्हणून आलेल्या गौराईचा आपण मोठया आनंदाने उत्साहाने मानसन्मान करतो मग आपल्या घरी राबवणाऱ्या गौराईचा सन्मान व्हावा ही सद्भावना मनामध्ये ठेवून जय हनुमान संस्थेकडून खास महिलांसाठी श्री क्षेत्र औदुंबर येथे मोफत यात्रा घडवून आणली आहे. यामध्ये 100 पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. संस्थेच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  जय हनुमान या संस्थेने गणपतीची मिरवणूक देखील अत्यंत पारंपारिक पध्दतीने काढली होती. या मिरवणूकीला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आरेवाडी येथील श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प.रामदास महाराज आणि ह.भ.प.मधुकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली लहान वारकरी यांनी टाळ, मृदूंग आणि नामाच्या गजरात काढलेली मिरवणूक लक्षवेधी ठरली. तसेच ...

माईंगडेवाडी येथे आरोग्य शिबीराचे आयोजन

Image
तळमावले/वार्ताहर प्रति वर्षाप्रमाणे माईंगडेवाडीचा राजा आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 20 सप्टेंबर रोजी ढेबेवाडी पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिराचा शुभारंभ झाला. या आरोग्य शिबिराचा परिसरातील लोकांनी लाभ घेतला अनेक युवकांनी रक्तदान ही केले सामाजिक हेतू डोळ्यासमोर ठेवून मंडळांनी प्रतिवर्षी आरोग्य शिबिराच्या आयोजन केलेले असते‌. कोरोना महामारी काळात राबवलेल्या उपक्रमामुळे येथील मंडळाचे चर्चेत आले आहे. मुंबईकर सर्व ग्रामस्थ गणेश उत्सव काळात गावाकडे घेऊन सामाजिक उपक्रम राबवत  असतात.पर्यावरण पूरक गणेश उत्सव त्याचबरोबर उत्कृष्ट मंडळ म्हणून ही मंडळ कार्यरत आहे. या आरोग्य शिबिरास तज्ञ डॉक्टर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली  श्री गणेश कृपा सेवा मंडळ माईंगडेवाडी मंडळाच्या कार्याचे प्रचंड कौतुक होत आहे

नितीन पाटील स्टार आयकाॅन पुरस्काराने सन्मानीत

Image
तळमावले/वार्ताहर महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन आणि भास्कर पब्लिकेशन न्यूज नेटवर्क यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा स्टार आयकाॅन पुरस्कार शिवसमर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे  नितीन पाटील यांना डाॅ.आण्णासाहेब डांगे, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत, सम्राट महाडीक, डाॅ.राजीव लोहार व अन्य मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी नितीन पाटील यांच्या समवेत रमेश पाटील, आशिष थोरात, विकास शिरसट, उत्तम धर्मे, अक्षय पाटील व अन्य उपस्थित होते. शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अँड.जनार्दन बोत्रे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शिवसमर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तळमावले च्या माध्यमातून अल्पावधीतमध्ये उद्योग क्षेत्रात नावारुपास येणारे आदर्श युवा उद्योजक म्हणून नितीन पाटील यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.   बांधकाम क्षेत्रात सातत्याने नवनवीन उपक्रम राबवून नितीन पाटील यांनी आपली कार्यसिध्दता दर्शवली आहे. उद्योगाचे माध्यमातून अनेक युवकांना रोजगाराची साधने उपलब्ध करुन त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. सातारा जिल्हयासह विविध परिसरात पाटील यांनी आदर्श उ...