जितकरवाडी-जिंती येथील दरड प्रवण क्षेत्रातील रहिवाशांचे तात्काळ पुनर्वसन करणार: तहसीलदार अनंत गुरव


ढेबेवाडी प्रतिनिधी 

तालुक्यातील अतिधोकादायक व दरड प्रवण क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जितकरवाडी-जिंती येथील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी शासन प्रशासनाने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. आज, गुरुवार दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी माननीय तहसीलदार श्री. अनंत गुरव यांनी स्थानिक ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि पुनर्वसन प्रक्रियेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

या महत्त्वपूर्ण बैठकीत बोलताना तहसीलदारांनी दरड प्रवण क्षेत्रात राहण्याचे भीषण धोके उपस्थितांना पटवून दिले. "ग्रामस्थांच्या जीविताचे रक्षण करणे हे शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासन नियमानुसार सर्वांना सुरक्षित ठिकाणी पक्की घरे बांधून देणार आहे," अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पाटण तालुक्यात संपादन प्रक्रिया पूर्ण होऊन मौजे आंबेघर येथे तयार झालेली नवीन घरे व तेथील पुनर्वसन प्रकल्प प्रत्यक्ष पाहण्यासाठी चितकरवाडीतील ग्रामस्थांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. तेथील काम पाहून ग्रामस्थांच्या मनातील शंकांचे निरसन होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला. पुनर्वसनाची प्रक्रिया अधिक वेगाने व्हावी यासाठी ती दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे:  पहिल्या टप्प्यात जे नागरिक संपादित जागेत तात्काळ राहण्यास तयार आहेत, त्यांची लेखी संमती घेऊन त्यांच्या घरांचे बांधकाम त्वरित पूर्ण केले जाईल.  त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित राहिलेल्या खातेदारांचे व ग्रामस्थांचे कामकाज प्राधान्याने पूर्ण केले जाईल.

शासनाची ही पुनर्वसन प्रक्रिया अत्यंत वेगाने राबवण्याची पूर्ण तयारी झाली आहे. त्यामुळे सुरक्षित भविष्यासाठी आणि कोणत्याही आपत्तीपासून बचावासाठी दळण/दरड प्रवण क्षेत्रातील लोकांनी या प्रक्रियेत लवकरात लवकर सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, 

या वेळी तहसीलदार अनंत गुरव यांच्यासह श्री. नागेश निकम, मंडळ अधिकारी श्रीमती मृदुला कुलकर्णी, ग्राम महसूल अधिकारी श्री. दुपटे तसेच जितकरवाडी-जिंती येथील स्थानिक खातेदार, शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

अक्षरप्रेमींचा गौरव..! राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार जाहीर

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न