'सा. स्पंदन एक्सप्रेस'ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभेच्छा....!
मुंबई/वार्ताहर
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव ) येथून प्रसिद्ध होणाऱ्या 'सा. स्पंदन एक्सप्रेस' या साप्ताहिकाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष पत्र पाठवून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे की, डाकेवाडी येथून 'सा, स्पंदन एक्सप्रेस' प्रसिद्ध होत असल्याचे समजून अत्यंत आनंद झाला. या प्रसंगी त्यांनी 'टीम स्पंदन एक्सप्रेस'चे मनापासून अभिनंदन केले.
तसेच, राज्यातील विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच केंद्र आणि राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती या साप्ताहिकाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
'सा. स्पंदन एक्सप्रेस'च्या अंकाचे प्रकाशन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी मुख्यमंत्र्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या पाठिंब्यामुळे आणि शुभेच्छांमुळे 'स्पंदन एक्सप्रेस'च्या संपूर्ण टीममध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Post a Comment