लोकनेते बाळासाहेब देसाई यांना शिवसमर्थ च्या वतीने अभिवादन


तळमावले/वार्ताहर

            महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री, पाटण तालुक्याचे दैवत लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचा 116 व्या जयंतीनिमित्त दि शिवसमर्थ मल्टीस्टेट सोसायटी व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने संस्थेच्या तळमावले येथील मुख्य कार्यालयात जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे, व्यवस्थापक नितीन पाटील, संदीप डाकवे, संस्थेचे अन्य अधिकारी, इतर मान्यवर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी संदीप डाकवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

           प्रारंभी लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून, पुजन करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन सौ.स्वाती पाटील यांनी तर आभारप्रदर्शन प्रकाश कुंभार यांनी केले. कार्यक्रमास मुख्य कार्यालयातील सर्व विभागाचे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग