मस्करवाडी येथे 'औदार्य शिवालय फाउंडेशन' चा भव्य उद्घाटन समारंभ
तळमावले/वार्ताहर
समाजकल्याण आणि आरोग्य सेवेचा वसा घेऊन 'औदार्य शिवालय फाउंडेशन' एका नव्या प्रवासास सुरुवात करत आहे. या संस्थेच्या नवीन कार्यालयाचा भव्य उद्घाटन समारंभ गुरुवार दि. १९ मार्च २०२६ रोजी दुपारी १२:१० वाजता मस्करवाडी (काळगांव), ता. पाटण येथे संपन्न होणार आहे.
"सेवा, समर्पण आणि समाजकल्याण" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू होणाऱ्या या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्र सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस फाउंडेशनने व्यक्त केला आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. लक्ष्मण मारुती मस्कर, उपाध्यक्ष श्री.शिवाजी गणपती मस्कर आणि सचिव श्री. चंद्रकांत किसन मस्कर असून, त्यांनी सर्व नागरिकांना या शुभप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Post a Comment