न्यू इंग्लिश स्कूल खळे येथे विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप

 

तळमावले :- 
        खळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल  या विद्यालयात नुकतेच  कराड को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक माननीय श्री. आनंदराव कचरे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी ही मदत केली. या प्रसंगी  त्यांच्यासमवेत त्यांचे बंधू  सूर्यकांत कचरे तसेच नवी मुंबई येथील नवनिर्वाचित नगरसेविका  दिक्षा  कचरे उपस्थित होत्या.
     या कार्यक्रमास न्यू इंग्लिश स्कूल खळेचे प्रभारी मुख्याध्यापक सुनील कांबळे , पल्लवी निकम  प्राथमिक शाळेचे केंद्रप्रमुख रमेश  पवार विकास चव्हाण विद्या यादव उपस्थित होते.
या मदतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांना पुढील शिक्षणासाठी अधिक प्रेरणा मिळेल, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी  पल्लवी निकम यांनी आभार मानले.


Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न