सैदापूर येथे मकरसंक्रांतीनिमित्त हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न


कराड/वार्ताहर

जाधव परिवार आणि शिवम् असोसिएटस कराड टीम यांच्या वतीने शिवम हाऊस येथे मकर संक्रांती निमित्त आयोजित केलेला हळदीकुंकू कार्यक्रम अत्यंत आनंदी व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन शिवम असोसिएटसचे गुलाब जाधव (फौजी), पीएसएल लीडर पुनम जाधव, अश्विनी पवार, रेश्मा डाकवे, अश्विनी पवार व अन्य मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.

उपस्थितांचे स्वागत पुनम जाधव यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी पवार यांनी केले. प्रास्ताविक रेश्मा डाकवे यांनी केले. सर्व मान्यवर व महिला वर्गाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्षितीज जाधव, राज जाधव, गणेश जाधव, स्पंदन डाकवे, सांची डाकवे व अन्य मान्यवर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न