सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना शिवसमर्थच्यावतीने अभिवादन

तळमावले/वार्ताहर

            नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या संयुक्त जयंती निमित्त दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को. ऑप.क्रेडिट सोसायटी लि. व शिवसमर्थ परिवार यांच्यावतीने तळमावले येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार ॲड.जनार्दन बोत्रे, उपाध्यक्ष शिवाजी सुर्वे, व्यवस्थापक नितीन पाटील, प्रशासन विभागाचे व्यवस्थापक संदीप डाकवे व संस्थेचे अन्य अधिकारी इतर मान्यवर उपस्थित होते.
            कार्यक्रमाची सुरुवात करताना नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून तसेच पुजन करुन अभिवादन करण्यात आले. तद्नंतर संस्थेच्या प्रशासन विभागाचे व्यवस्थापक श्री. संदीप डाकवे यांनी सुत्रसंचालन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली आणि प्रास्ताविक मांडले. प्रस्ताविकामध्ये त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा संक्षिप्तपणे आढावा सांगितला. अनिता मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. तद्नंतर कार्यक्रमाचे आभार सौ.स्नेहल पाटील यांनी मांडले 

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान