क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या वतीने 2026 च्या दिनदर्शिकेचे उद्घाटन
कुठरे/सुनील पवार यांचेकडून
क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 2026 ची दिनदर्शिकेचे उद्घाटन पवारवाडी गावातील ग्रामस्थांच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. धार पवारबांधव व भगिनी व देऊन ज्येष्ठांना मान देऊन या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले . क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्था ही पवार बांधवांसाठी स्थापन करण्यात आलेली आहे. आणि या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील धार पवार एकत्र यावे आणि बंधुभाव वाढवावा त्याचबरोबर आपले गोत्र आपला मूळ पुरुष आपली कुलदेवता आणि आपले संस्कार या संस्थेच्या माध्यमातून सदैव जपण्यात येतात आणि सर्वांना नवीन तरुणांना माहिती देण्यात येते. जेणेकरून येणाऱ्या पिढीला आपल्या धार पवार बांधवांचा सुसंस्कृत व लढाऊ इतिहास माहिती असावा याकरिता हा सर्व कार्यक्रम महाराष्ट्रभर ही संस्था घेत असते. याचेच एक कार्यक्रमाचा भाग कुठरे पवारवाडी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना मान देऊन त्यांच्या हस्ते या दिनदर्शिकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी धार पवार बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या अध्यक्षस्थानी सरपंच अंकुशराव पाटील, उद्योजक जगदीश शेठ व पंकज पवार ,जगन्नाथ पवार, देवांक पवार, संस्थेचे सचिव अविनाश पवार हे उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी संस्थेचे आभार मानले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
खूप खूप शुभेच्छा 🌹🎉🙏
ReplyDelete