पाटण येथे आजी/माजी सैनिक तालुका स्तरीय बैठक संपन्न
तळमावले/वार्ताहर
पाटण प्रांत अधिकारी श्री सोपान टोम्पे व तहसीलदार श्री. अनंत गुरव यांच्या अध्यक्षतेखाली व सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व उपसंचालक सैनिक कल्याण विभाग पुणे ले कर्नल सतेश हंगे यांच्या उपस्थितीत सैनिक व कुटुंबिय यांची तालुकास्तरीय बैठक संपन्न झाली. महसूल, ग्रामविकास, वन , पोलिस, भूमी अभिलेख, सर्व विभागातील समस्या अडचणी लेखी अर्ज घेऊन कारवाई करण्यात आली प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले व त्यांनी सांगितले की कार्यालयात सैनिक व कुटुंबिय यांच्या समस्या संदर्भात सैनिकांसाठी समस्या संदर्भात लेखी अर्ज घेऊन आपण केव्हाही ऑफिस वेळेत भेटू शकता व आपले अर्ज जमा करु शकता ते स्वीकारले जातील व मदत केली जाईल तालुका प्रशासन सैनिक व कुटुंबिय यांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वासित केले. या प्रसंगी या बैठकी साठी श्री प्रशांत कदम सदस्य जिल्हा संरक्षण समिती व अमृतवीर जवान अभियान राज्य उपाध्यक्ष सैनिक फेडरेशन हे आवर्जून उपस्थित राहिले व त्यांनी सैनिक व कुटुंबिय यांना जिल्हा स्तरावर संरक्षण समिती बद्दल माहिती देण्यात आली व सर्व आजी-माजी सैनिक व कुटुंबिय, शहीद जवान कुटुंबीय यांना आपले गावामध्ये होत असलेला त्रास, खोटे गुन्हे दाखल करणे या बाबत माहिती दिली ज्यांना असा चुकीच्या पद्धतीने त्रास कोण देत असेल तर त्यांनी संरक्षण समिती सदस्य यांच्याकडे अर्ज जमा करावे व ते जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मासिक मीटिंग मध्ये सादर केले जातील व त्याचेवर तत्काळ कारवाई होईल अशी सर्व माहिती देऊन अवगत करण्यात आले.
या बैठकीसाठी श्री प्रशांत कदम शासकीय सदस्य जिल्हा संरक्षण समिती व अमृतवीर जवान अभियान व राज्य उपाध्यक्ष सैनिक फेडरेशन व जिल्हा सैनिक कल्याण संघटक श्री एल कुंभार आवर्जून उपस्थित होते.
या बैठकीचे सूत्र संचालन पाटण तालुका कार्याध्यक्ष श्री प्रकाश मसुगडे यांनी केले व आभार श्री. प्रभाकर नलवडे अध्यक्ष पाटण तालुका यांनी मानले. मार्गदर्शन श्री. संतोष यादव उपाध्यक्ष पाटण तालुका यांनी केले.
याप्रसंगी प्रांत कार्यालयातील माजी सैनिक श्री. शिवाजी लुगडे, पाटण तालुका सैनिक संघटना अध्यक्ष श्री सदाशिव जाधव, संघटक पाटण तालुका सैनिक फेडरेशन श्री अधिकराव महापुरे, सेवारत सैनिक अंजुम डांगरी, माजी सैनिक श्री.रमेश वारंग, श्री जालिंदर येळवे, श्री संदीप पाटील माजी सैनिक सुपुत्र सुधीर शिर्के, सर्व तालुक्यातील माजी सैनिक व कुटुंबिय बहुसख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment