36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

कराड/वार्ताहर

         मराठा साम्राज्याची राजधानी व सैनिकांचा जिल्हा म्हणून नावलौकिक मिळवलेला शूरवीरांचा जिल्हा म्हणजे सातारा. त्यातीलच एक 36 मराठा माध्यमिक धुवाधार तोफखान्याचा राजधानी ग्रुप सातारा आहे. तोफखान्याच्या माध्यमातून स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. त्याला प्रत्येक वर्षी प्रचंड प्रतिसाद,  वाढता उत्साह आणि त्यातूनच सर्वांना सकारात्मक ऊर्जा मिळत आहे. या मेळाव्यामध्ये आजी-माजी सैनिकांबरोबरच त्यांच्या मित्रमंडळींना, पै पाहुण्यांना तसेच नातलगांना आमंत्रित करून खऱ्या अर्थाने सैनिकांप्रती देशाप्रती जनजागृती करण्याचे अलौकिक असे कार्य राजधानी ग्रुप सातारा तर्फे केले जात आहे.

स्नेहसंमेलनासाठी आलेल्या आजी-माजी सैनिकांच्या पै पाहुण्यांना, नातलगांना, सैनिकी जीवनातील सैनिकांप्रती एक- दुसऱ्याच्या प्रति असलेला आदर-सत्कार, मैत्री आणि राष्ट्र तसेच देशावर असलेले देशप्रेम पाहून आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना खरंच सातारा जिल्ह्याची दिवसेंदिवस घटती सैन्य संख्या, याला वाचा फोडणारी परंपरा शूरवीरांचा जिल्हा किंवा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी आपणही भारतीय सैन्य दलात दाखल होऊन यांच्याप्रमाणेच नावलौकिक मिळवण्यासाठी राजधानी ग्रुप प्रेरित करत आहे. 

या अनोख्या स्नेहमेळाव्याची सुरुवात दिपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमांमध्ये देशभक्तीभक्तीपर गीते, होममिनिस्टर, मनोगते असे विविध उपक्रम ठेवण्यात आले होते. रेजिमेंट चा इतिहास निवेदिका प्रियांका मॅडम नी सविस्तर सांगीतला. तद्नंतर होममिनिस्टर कार्यक्रमातील मध्ये शिवांजली ज्वेलर्स (श्री उदय पवार शेठ व सौ शिल्पा उदय पवार )तर्फे प्रथम, व्दितीय आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी महिलांना बक्षिस देऊन सन्मानित केले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनिटचे कर्नल आनंद गजानन थत्तेसाहेब, आणि शौर्य चक्र, ऑर्डिनरी कॅप्टन शिवाजी कृष्णा घाडगे,  सुभेदार रामदास शिंदे, सुभेदार अशोक नलावडे, सुभेदार काशिनाथ सरडे, हवालदार वामन शिंदे, हवालदार बजरंग कदम, हवालदार बाळू मोरे, हवालदार संजय धोंडवड, हवालदार जालिंदर येळवे तसेच राजधानी ग्रुपचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम गीताने सांगतात करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप