जयभीम कांबळे महाराष्ट्र उद्योजकता पुरस्काराचे मानकरी

तळमावले/वार्ताहर

            उद्योग क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बद्दल महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५ हा भव्य दिव्य सोहळा नाशिक या ठिकाणी नुकताच पार पडला. यामध्ये सातारा जिल्ह्यातून सौर ऊर्जा प्रकल्प उभारणारी सोलर पॉवर व्हिजन कंपनीच्या कामगिरीबद्दल जयभीम कांबळे यांना मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर मॅडम यांच्या हस्ते महाराष्ट्र उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी युको बँकेचे डीजीएम आणि झोनल अधिकारी अमलेश त्रिपाठी, जीएसटी चे सहाय्यक आयुक्त चेतनसिंग रजपूत यांची उपस्थिती होती.
             जयभीम कांबळे यांनी पुणे,सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर जिल्ह्यात सौर ऊर्जेच्या माध्यमातून शासनाच्या पर्यावरणपूरक सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आपल्या कंपनीच्या माध्यमातून चांगली कामगिरी केली आहे.  या पुरस्काराबद्दल जयभीम कांबळे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न