शर्विल गावडे ने भरवला बालकांना सुखाचा घास देऊन साजरा



नवी मुंबई/ वार्ताहर 

रामभाऊ महादेव कोळेकर संस्थापक अध्यक्ष आधार फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी भाचा शर्वील संगम गावडे याचा वाढदिवस दिघा नवी मुंबई येथील प्रिसकिल्ला चिल्ड्रन्स होम ( फ्रेण्डशिप सेंटर)  या अनाथ आश्रम मधील मुलांना जिवनावश्यक वस्तु देत वाढदिवस साजरा केला.

 मोठं मोठे केक कापून वाढदिवसाचे प्रदर्शन करण्यापेक्षा प्रत्येकाने जन्मदिनी या अनाथ बालकांना सुखाचा घास दिल्यास ईश्वराचे  आशिर्वाद मिळतील.

आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून अनाथ मुलांची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे व आपले कर्तव्य आहे या समाजासाठी काहीतरी करणं व आपल्या आनंदात अनाथ मुलांना सामावुन घेणं व त्यांची मदत रुपी सेवा करुन  त्याचं दुःख कमी करणं म्हणुन अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा करत आहोत. आजपर्यंत आधार फाऊंडेशन घ्या माध्यमातून अनाथ आश्रम, वृध्द आश्रम खेडेगावातील शाळा व विधवा आधार नसलेल्या महिलांन साठी कार्यक्रम राबविण्यात आले आहेत, ईथुन पुढेही अशीच चांगली सेवा हातुन घडावी हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏


Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न