समाजप्रेमी आणि मनमिळावू - शिवाजीराव डाकवे (आण्णा)
हसतमुख चेहरा, गोरा वर्ण, नेहमी इन केलेला पेहराव, हातामध्ये ब्रिफकेस यामुळे शिवाजीराव डाकवे उर्फ आण्णा यांचे व्यक्तिमत्त्व अधिकच उजवे दिसायचे. पाहताक्षणी ते इतरांच्यावर छाप पाडत असत.
डाकेवाडीमध्ये सार्वजनिक कार्यक्रम, पारायण, इतर धार्मिक कार्यक्रम यामध्ये आणांचा विशेष सहभाग होता. सुरुवातीचे श्री दत्त मंदीर उभारणी करण्यामध्ये स्व.बाबुराव डाकवे (काका) यांच्यासोबत आण्णांचे योगदान मोलाचे होते. पारायणाची रौप्य महोत्सवी वर्षाची स्मरणकिा काढण्यामध्ये आण्णानी हिरीरीने सहभाग घेतला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि संजय तुकाराम डाकवे (पुणे) यांनीही स्मरणणिका पुर्ण केली होती. त्यामध्ये अनेक जुने संदर्भ, फोटो आण्णांनी आम्हाला मिळवून दिले होते. गिरगांव (मुंबई) येथील नाटय रसिकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या साहित्य मंदीर नाटयगृहामध्ये देखील आण्णांनी आपली कला सादर केली होती. सुप्रसिध्द अभिनेते सुहास भालेकर यांच्या समवेत त्यांनी "गाढवाचं लग्न" या नाटकांत काम करुन कलामंचावर विशेष दाद मिळवली होती. त्यांना कला क्षेत्राची विशेष आवड होती.
वांगव्हॅली को. ऑप. क्रे. सोसायटीच्या उभारणीमध्ये बाबुराव डाकवे काका व अन्य मान्यवर यांच्या सोबत आण्णांनी दिलेले योगदान स्मरणीय आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक अशा सर्व पदांना योग्य न्याय देत त्यांनी वांगव्हॅली सोसायटीमध्ये योगदान दिले आहे.
"दै.नवाकाळ" मधील माझ्या बातम्या वाचून किंवा टीव्ही चॅनेलवरील बातम्या पाहून आण्णा नेहमी मला व्हाॅटसअपला मेसेज पाठवायचे तसेच फोन करुन संवाद साधायचे. त्यांच्या शब्दांनी प्रेरणा मिळायची.
काही दिवसांपासून ते आजारी होते. गावी असताना ते आवर्जून आमच्या घरी यायचे. गतवर्षी माझे वडील राजाराम डाकवे (तात्या) यांच्या व्दितीय पुण्यस्मरणानानिमित्त आवर्जून घरी आले होते. तब्बेतीसाठी ते मुंबईला दवाखान्यात ॲडमिट होते. परंतू त्यांना आपल्या गावची ओढ होती.
सोमवार दि.20 जानेवारी, 2025 रोजी दुपारी 12 वाजून 17 मिनिटाच्या दरम्यान आण्णांची मोठी कन्या विजया हिच्याशी आण्णांच्या तब्बेतीबाबत बोलणे झाले होते. आणि सकाळी त्यांच्या श्रध्दांजलीचा फोटो पाहिला आणि धक्काच बसला.
दिलखुलास, समाजप्रेमी आणि मनमिळावू स्वभाव असणारे आण्णा आकस्मिक आपल्यांतून निघून गेले. त्यांच्या अकाली जाण्यामुळे त्यांच्या कुटूंबावर जो आघात झाला आहे त्यातून इश्वराने त्यांना सावरण्याची शक्ती देवो तसेच ईश्वराने त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो ही प्रार्थना.
डाॅ.संदीप डाकवे
स्पंदन-सांची परिवार

Comments
Post a Comment