अमृत वाडी येथे पालक शिक्षक व विद्यार्थी सहविचार सभा संपन्न


पाचवड/वार्ताहर

पाचवड येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाने शिक्षक आपल्या दारी या नवोपक्रम अंतर्गत अमृत वाडी या गावामध्ये पालक शिक्षक सहविचार सभेचे आयोजन केले होते.ग्रामीण भागातील बऱ्याच पालकांना शाळेत पालकसभेस  वेळे अभावी उपस्थित राहता येत नसते. यास्तव पाल्याच्या संदर्भात चर्चा व शाळेतील भविष्यकालीन विकासात्मक बदल याची माहिती पालकांना व्हावी ह्या हेतूने या सभेचे आयोजन केले होते.

    या सहविचार सभेत मा.श्री.दत्ताशेठ बांदल सदस्य,स्कूल कमिटी हे अध्यक्ष स्थानी होते. प्राचार्य  सौ.मुल्ला एन.ए.यांनी प्रास्ताविक केले.श्री.अमीर मुजावर यांनी भविष्यकालीन योजनाची माहिती दिली. गुरुकुल प्रमुख सौ.पाटोळे मॅडम यांनी गुरुकुल प्रकल्पांतर्गत विविध उपक्रमांची माहिती दिली.श्री.अमोल गोसावी यांनी स्पर्धा परीक्षा यावर महत्त्वपूर्ण माहिती दिली.श्री.बाळासाहेब कचरे सर यांनी कलेचे प्रवाह ,करिअर याविषयी माहिती दिली. ज्यू. कॉलेज  विभाग प्रमुख सौ.मोकाशी.पी. व्ही.यांनी कॉलेज मधील सोई सुविधा याविषयी माहिती दिली.

  अध्यक्षीय मनोगतात मा. श्री.बांदल यांनी पालकांना योग्य सूचना देऊन आपल्या पाल्यासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले.या सभेसाठी पन्नासच्या वर माता व पिता पालक आपल्या पाल्या सोबत उपस्थित होते.अनेक पालकांनी या उपक्रमविषयी समाधान व्यक्त केले.

  या सहविचार सभेसाठी अनेक ग्रामस्थ व ग्राम पंचायतीचे सदस्य श्री.रघुनाथ कुंठे उपस्थित होते.सूत्रसंचालन श्री.कचरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.साधना पाटोळे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग