इंद्रजीत पाटील अक्षर साधना काव्य प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
वार्ताहर - साहित्य,कला,विचार मंच आणि उचाट शिक्षण संस्था उचाट,ता.वाडा जि. पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात कवी इंद्रजीत पाटील यांना सन्मानित करण्यात आले. त्यांच्या 'कळ पाेटी आली ओठी' या परिपूर्ण अष्टाक्षरी कवितासंग्रहाची अक्षर साधना राज्यस्तरीय काव्य प्रेरणा पुरस्कारासाठी प्रथम क्रमांकाने निवड करण्यात आली होती. कै.राखी संताेष वेखंडे यांच्या स्मरणार्थ युवराज संतोष वेखंडे यांच्या साैजन्याने हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.राेख रक्कम,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.प्रस्तुत संमेलनाचे अध्यक्ष मा. डाॅ.श्रीकांत पाटील,स्वागताध्यक्ष मा.डाॅ.ज्याेतीताई ठाकरे,प्रमुख अतिथी मा.श्री.महेश म्हात्रे,महेश माेरे,रामूकाका,अशाेकपाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार त्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आला.त्यांच्या या कवितासंग्रहास अल्पावधीतच मिळालेला हा पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार असून त्यांच्या साहित्यिक कामगिरीचे सर्वत्र काैतुक हाेत आहे.सदर संमेलनाचे सर्वेसर्वा मा.श्री.विजय जाेगमार्गे यांनी उत्तम आयाेजन केले.कवी इंद्रजीत पाटील यांच्या साहित्य क्षेत्रातील या यशाबद्दल त्यांचे ईष्टमित्र,नातेवाईक यांनी अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Comments
Post a Comment