कर्म हीच पूजा, रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा - - मंगेश चिवटे

 

प्रतिनिधी :

        कायकवे कैलास : कर्म हीच पूजा, रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा - महात्मा बसवेश्वर यांचा विचार कृतीतून पुढे नेणे गरजेचे असे मत मंगेश चिवटे यांनी व्यक्त केले. यावेळी प. पू. डॉ. सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, शंकरराव मोरगे, प्रमुख वक्ते हैबतपुरे, सज्जनकुमार लोनाळे, सत्कारमूर्ती शि. भ. प. संगमेश्वर महाराज वलांडी, प्रसिद्ध व्याख्याते किरणजी कोरे, भगवान चिवडे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

        19 जानेवारी रोजी जांब तीर्थ, अहमदपूर येथे लिंगायत चिंतन बैठकीला हजेरी लावली. समाज एकत्र येण्याच्या दृश्चिकोनातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत बसवान्ना महाराज यांच्या विचारांनी उपस्थित बांधव मंत्रमुग्ध झाले होते.
यावेळी अनेक बांधवांनी आपले म्हणणे सर्व उपस्थितांसमोर मांडले. त्याचबरोबर जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज विकास महामंडळात राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी वाढीव निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील असे सांगितले. सोबतच असे चांगले विचार पोहचवणाऱ्या मंचाला 25 हजारांची आर्थिक देणगी जाहीर केली. यातून जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचे विचार आणि आचार सर्वसामान्य बांधवांपर्यंत पोहोचतील.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न