कुंभारगाव येथील कळंत्रेवाडी शिवारात ऊसाचा उभा फड जळून खाक


कुंभारगाव/वार्ताहर

 कुंभारगाव ता,पाटण येथील कळंत्रेवाडी शिवारातील अजित पाटील यांच्या आंब्याच रान, बरकाड शेतातील उभ्या ऊसाला शुक्रवार १७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता मोठी आग लागली या आगीत सुमारे दोन एकर ऊस जळून गेला या आगीने उभ्या ऊसाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले या घटनेचे गांभीर्य ओळखून शनिवारी सकाळी महावितरणचे सिनियर सुपर वायजर दिलीप घोलप, महावितरण तळमावले चे सेक्शन ऑफिसर धनजय शेंडे, वायरमन नटराज कांबळे, पोलिस पाटील अमोल गायकवाड,यांनी घटना स्थळावर भेट देवून शेतातील ऊसाला विद्युत पुरवठा शार्ट सर्किटने आग लागली का ? याची पाहणी केली नक्की आग कश्याने लागली याचे कारण समजू शकले नाही या जळीत ऊस फडाचा  पंचनामा ग्राम महसूल अधिकारी बाळासाहेब गायकवाड सहाय्यक हणमंत कारंडे यांनी केला या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे उभा ऊस जळालेला साखर कारखाना तातडीची तोड देवून तोडण्यात यावा अशी मागणी शेत मालक अजित पाटील यांनी केली या जळीत ऊस प्रसंगी रयत साखर कारखान्याने गांभीर्याने नोंद घेत  तातडीने ऊस तोड दिली.

Comments