दत्त मंदिरांचा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा 22 रोजी

नितीन बेलागडे /ढेबेवाडी 

पाटील आवाड मंद्रुळकोळे ता पाटण येथील लोकसहभागातून होत असलेल्या दत्त मंदिरांचे काम अंतिम टप्प्यात आले असून मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा बुधवार दिनांक 22 रोजी संपन्न होत असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे

पाटील आवाड येथील जुन्या दत्त मंदिरांच्या जागी नवीन दत्त मंदिरांचे काम व्हावे अशी इच्छा येथील ग्रामस्थांची होती   त्या साठी गावातील ग्रामस्थांनी एकजुटीने प्रयत्न सुरू केले होते शंभू राजे देसाई यांनी मंदिराच्या सभा मंडपासाठी13 लाख रुपये मंजूर केले तर पाटील आवाड येथील ग्रामस्थांनी या मंदिराच्या कामासाठी भरीव आर्थिक मदत देखील केली आहे परिसरातल्याही व्यापारी ग्रामस्थांनी व्यवसायिकांनी ह्या मंदिराच्या कामाला मदत केल्याचे आयोजकांनी सांगितले सुमारे 40 लाख रुपये खर्चून भव्य मंदिर उभे करण्यात आवाडरकरांना यश आले आहे  बुधवार दिनांक 22 रोजी या मंदिराच्या जीर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण  कार्यक्रमाचा सोहळा संपन्न होत आहे यासाठी  आवाड येथील ग्रामस्थांच्या कडून रविवारी दि 19 पासून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे बुधवारी धारेश्वर महाराज यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा संपन्न होत आहे यासाठी आवड नगरीत सगळीकडे  आनंदाचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न