मातीतल्या लोकांनी केलेला सन्मान लाखमोलाचा : कविता राम


तळमावले/वार्ताहर

गावाकडच्या आपल्या मातीतील लोकांनी केलेला सन्मान लाखमोलाचा आहे, त्याची तुलना होवू शकत नाही असे भावनिक उद्गार सुप्रसिध्द पार्श्वगायिका कविता राम यांनी काढले. त्या पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील ‘स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीने देण्यात येणाया राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड पुरस्कार वितरणानंतर संवाद साधताना बोलत होत्या.

कुंभारगांव (ता.पाटण) जवळील एका छोटयाशा गावातील असलेल्या कविता राम यांनी चंदेरी दुनियेत आपल्या जादुई आवाजाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक दिग्गजांसमवेत त्यांनी आपली कला सादर केली आहे. मालिका टायटल साॅंग, चित्रपटातील गाणी त्यांच्या आवाजाने खुलली आहेत. चंदेरी दुनियेत आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या कविता राम यांनी आपली गावाशी असलेली नाळ मात्र जपली आहे.

कविता राम या समाजभान जपणाया सेलिब्रिटी असून त्यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या अनेक उपक्रमात आपले योगदान दिले आहे. याशिवाय सोशल मिडीयाच्या माध्यमातून ट्रस्ट च्या उपक्रमाचे कौतुक करत असतात. तसेच त्यांनी देखील समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना मदत करत आहेत. ‘स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या वतीने त्यांना कला आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड हा पुरस्कार तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थानाचे मठाधिपती डाॅ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे माजी कक्षप्रमुख मंगेश चिवटे, मालिका दिग्दर्शक विठ्ठल डाकवे, अभिनेते पंकज काळे, राष्ट्रवादी काॅंग्रसे शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सौ.संगिता साळुंखे, पत्रकार गजानन तुपे, अभिनेत्री अंजली आकळे, शिवम असोसिएटसचे गुलाब जाधव, ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, सौ.रेश्मा डाकवे व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

गावाकडच्या आपल्या मातीतील लोकांनी केलेला सन्मान लाखमोलाचा आहे, त्याची तुलना होवू शकत नाही असे उद्गार काढून त्यांनी आपले गावाशी असलेले नाते अधिकच घटट केले आहे. कविता राम यांनी आपल्या गावाकडील लोकांच्या केलेल्या कौतुकामुळे सन्मानाला चार चाॅंद लागले आहेत तर पुरस्काराबद्दल कविता यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग