माथाडी दवाखान्यातुन सर्वोत्तम आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न- गुलाबराव जगताप
नवी मुंबई (संजय सावंत)
नवी मुंबईतील माथाडी कामगारांसाठी असलेल्या माथाडी दवाखान्यातुन चांगली आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न आहे असे प्रतिपादन माथाडी दवाखाना चे विश्वस्त व हिंदूस्थान सहकारी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव जगताप यांनी केले.
रोटरी क्लब नवी मुंबई सी विभाग क्रास टिंबर्स रोटरी टेक्सास, युएस यांचे मार्फत सोनोग्राफी उपकरण व डेंटल इक्विपमेंट अरुण मुर्ती यांच्या मातोश्री डॉ लीला मूर्ती स्मरणार्थ भेट वाटप कार्यक्रम माथाडी दवाखाना कोपरखैरणे नवी मुंबई याठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी मुख्य अतिथी रोटरीयन दिनेश मेहता-(डिस्ट्रिक्ट गव्हर्नर), रोटरीयन सुनील शाह- अध्यक्ष, रोटरीयन बी. व्ही.रविप्रकाश-प्रोजेक्ट चेअरमन, माथाडी हॉस्पिटलचे ट्रस्टी गुलाबराव जगताप, माथाडी दवाखाना वैद्यकीय अधिकारी हनुमंतराव पाटील, डॉ.सौ.राजश्री पाटील, डॉ.अशोक पाटील, रोटरी क्लबचे सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
गुलाबराव जगताप म्हणाले की, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या दूरदृष्टीतून माथाडी दवाखान्याची स्थापना करण्यात आली आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून कष्टकरी माथाडी कामगारांना अत्यल्प सवलतीच्या दरामध्ये या ठिकाणी आरोग्य सेवा देण्यात येत असते. रोटरी क्लब न्यू बॉम्बे सी विभाग यांच्या माध्यमातून माथाडी दवाखान्याला दोन डेंटल इक्विपमेंट्स व सोनोग्राफी उपकरण देण्यात आले आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदन त्यांनी केले.
सुनील शाह म्हणाले की, रोटरी क्लब च्या माध्यमातून डॉ लीला मूर्ती यांनी माथाडी दवाखान्यासाठी आरोग्य सेवेसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्यांची नुसतेच निधन झाल्यामुळे त्यांची पुत्र श्री.अरुण मूर्ती यांनी त्यांची स्वप्न पूर्ण केले. भविष्य काळामध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून माथाडी दवाखान्याला सौर ऊर्जा प्रकल्प ही देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
दिनेश मेहता म्हणाले की, ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे अशा ठिकाणी मदत देणे खूप गरजेचे असते याच सदभावनेतून माथाडी गोरगरीब कामगारासाठी रोटरी क्लबने सोनोग्राफी मशीन व डेंटल इक्विपमेंट्स हे साहित्य माथाडी दवाखान्यास प्रधान करण्यात आले आहे. सोनोग्राफी उपक्रमाच्या माध्यमातून स्त्री आरोग्याच्या साठी योग्य ते निदान करुन त्यावर चांगली उपचार मिळावेत म्हणून ही अद्यावत स्वरूपाची यंत्रसामुग्री दवाखान्यास भेट दिलेली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर दंत विकारावर रुग्णांची संख्या आहे.अशा रुग्णांना जलद गतीने सेवा देण्यासाठी अद्यावत दोन डिटेल इक्विपमेंट मशीन देण्यात आलेले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देऊन त्यांच्यामुळे आरोग्य सुधारेल की जेणेकरून मदत करणाऱ्यालाही अधिक प्रमाणावर मदत करण्यासाठी आनंद होईल अशा प्रकारचे काम या दवाखान्याच्या माध्यमातून व्हावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. जवळपास 40 ते 42 लाखाचे हे साहित्य रोटरी क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेले आहे भविष्य काळामध्ये लाईट बिल ची बचत होण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प ही या दवाखान्यास देण्याच्या प्रयत्नही केला जाईल अशी ती म्हणाले. यावेळी माथाडी दवाखान्यातील डॉ. भारती मोरे, डॉ.चारु नाईक डॉ. अमर यादव यांनी मनोगते व्यक्त केली.
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हनुमंतराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. बाबासाहेब थोरात यांनी सूत्रसंचालन केले यावेळी माथाडी दवाखान्यातील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते तसेच माथाडी कामगारांचे प्रतिनिधी व माथाडी कामगार यावेळी उपस्थित होते.

Comments
Post a Comment