शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

तळमावले/वार्ताहर            

पाटण तालुक्यातील एका छोट्याशा खळे शिद्रुकवाडी गावात अल्बम सोंग ची निर्मिती करण्यात आली, हे गाणं कॉलेजच्या जीवनावर आधारित रोमँटिक लव्ह सोंग आहे यामध्ये तीन जोड्या लीड रोल मध्ये असून स्टोरी कव्हर करण्यासाठी इतर कलाकारांना संधी दिली आहे,या गाण्यात मोठमोठ्या कलाकारांना संधी देताना नवीन कलाकारांना स्व;ता चे व्यासपीठ निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे "स्वर प्रोडक्शन" आणि "ओम तेजा प्रोडक्शन" यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मिती होत असून, गाण्याचे निर्माते, आशिष सावंत, दिग्दर्शक महादेव शिरोळकर आहेत,

               गीतकार शिवाजी सावंत, विकास खराते,तर चाल शरद पवार यांची आहे,गाण्यातील लीड कलाकार म्हणून प्रशांत बोदगिरे, गौरी सावंत, आनंदा चव्हाण, प्रचिती चांदणे,हृशल जाधव, अनुष्का गुरव असुन इतर नविन कलावंतांना संधी उपलब्ध करून दिली आहे, कला दिग्दर्शक,विनय भगत, DOP अमोल यादव मेकअप सरिता येवले,

            गायिका प्रांजल बोधक, संगीत गायक,आकाश हजुगडे, असून चित्रपट महामंडळाच्या अनेक सभासदांचे या गाण्यासाठी मोलाचं योगदान दिले आहे,

            या गाण्याच्या चित्रिकरणाच्या उद्घाटनप्रसंगी चित्रपट निर्माते अरुण कचरे, समाधान पाटील, अंकुश कापसे,सरपंच महेश शिद्रुक, काढणे गावाचे सरपंच सुरज चक्के,  मोहन जाधव, महेश ठिक, प्रमोद साळुंखे, रामभाऊ डुबल रमेश रजपुत सचिन काजारी,निवास शिद्रुक, सुदर्शन भोसले, महेश घागरे यांच्या उपस्थितीत पार पडला.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग