न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज,काळगाव विद्यालयात ७८वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

 

काळगांव/ महादेव थोरात यांचेकडून 

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज,काळगाव विद्यालयात ७८वा  स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. एस.एस.सी. मार्च 2024 परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेली विद्यालयाची विद्यार्थिनी कु.वैष्णवी नितीन पाटील हिच्या हस्ते विद्यालयामध्ये ध्वजारोहण करण्यात आले.विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. ए.पी. कांबळे सर यांनी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत केले.विद्यालयाच्या वतीने आजी-माजी सैनिकांचा ,सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कु.वैष्णवी पाटीलचे वडील श्री.नितीन पाटील (पोलीस पाटील कळगाव) व आई सौ.वर्षा पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास काळगावच्या सरपंच सौ.राखीताई काळे, उपसरपंच श्री. बाबुराव मस्कर ,स्कूल कमिटीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य,विविध कार्यकारी सोसायटी सदस्य, काळगाव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, विद्यालयाचे माजी विद्यार्थी, विद्यालयातील विविध समित्यांचे पदाधिकारी,सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी सैनिक  व विद्यार्थी विद्यार्थिनी इ.उपस्थित होते. विद्यालयातील ध्वजारोहणानंतर ग्रामपंचायत काळगाव, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा शाखा काळगाव व विकास सेवा सोसायटी काळगाव या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विकास सेवा सोसायटी काळगाव यांच्यावतीने इ. 5 वी ते 12वी  अखेर प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना व एन.एम.एम.एस. सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. श्रीमती रेश्मा प्रवीण पवार यांनी त्यांचा मुलगा कै.चि.कुलदीप पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विद्यालयातील इयत्ता 10 वी मध्ये प्रथम येणाऱ्या व इयत्ता 12 वी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1000/- रुपये बक्षीस जाहीर केले व त्यांच्या हस्ते या  बक्षिसाचे वितरण करण्यात आले. श्रीम.माने एस.एम. यांच्या मार्गदर्शनाखाली गीत मंचातील विद्यार्थ्यांनी खूप छान देशभक्तीपर गीते सादर केली.सौ.जाधव एम.एस. श्री.धोत्रे एस.पी.श्री.साबळे एम.जी.श्री. थोरातएम.एस. श्री.कांबळे टी.व्ही.श्री.देसाई व्ही.टी. सौ.पाटील व्ही.व्ही. श्रीम.भिंगारदेवे एस.आर.श्रीम.काळे एस.जे. यांनी विद्यार्थी विद्यार्थ्यांना खाऊवाटप केले.सौ.मुळे एम.के.यांनी सूत्रसंचालन केले.सौ.यादव एस.एस.व श्री.पाटील एस.आर.यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शिद्रुकवाडी-खळे येथे 'इशारा करतोय नजरेनं' या गाण्याचे शुटिंग

पाटण तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप

36 मराठा माध्यमिक तोफखाना रेजिमेंट चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न