कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
तळमावले/वार्ताहर
महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत राज्यात कृषि आणि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या , कृषि उत्पादन आणि उत्पन्न वाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच कृषि विस्तारामध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्ती/संस्था/गट यांना डाॅ.पंजाबराव देषमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, सेंद्रीय शेती कृषिभूषण पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार व कृषि विभागामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना पद्मश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील कृषि सेवारत्न पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येते.
महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत सन 2023 या वर्षामध्ये कृषि व संलग्न क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्ती/गट/संस्था यांचे उपरोक्त प्रमाणे विविध कृषि पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकरी/गट/संस्था/व्यक्ती यांनी विविध कृषि पुरस्कार प्रस्ताव आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करणेबाबत मा.श्री.रविंद्र बिनवडे, (भाप्रसे), आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य, यांनी राज्यातील शेतकरी/गट/संस्था यांना आवाहन केले आहे. विविध कृषी प्रस्ताव तयार करणेकामी अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाषी संपर्क साधावा. असे आवाहन कृषी संहसंचालक (विप्र-2) कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

Comments
Post a Comment