कु.श्रीशा विकास देसाई हिचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

तळमावले/वार्ताहर

            महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने दि.18 फेब्रुवारी रोजी इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. त्यामध्ये कुसूर (ता.कराड) येथील कु.श्रीशा सीमा विकास देसाई हिने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इ.5 वीमध्ये जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावून शिष्यवृत्तीधारक बनली आहे. या उज्ज्वल यशाबद्दल कु.श्रीशाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

               महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे च्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच बेवसाईटवर प्रसिध्द करण्यात आला आहे. इयता पाचवीच्या परीक्षेसाठी 19 हजार 86 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. तर इयत्ता 8 वी साठी 13 हजार 3639 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी पाचवीसाठी 474 मुले गुणवत्ता यादीत झळकले आहेत. त्यामध्ये कु.श्रीशा हिने स्थान मिळवले असून ही अभिनंदनाची बाब आहे.

Comments

Popular posts from this blog

डाकेवाडीत बिबट्याची दहशत: गोठ्यात घुसून शेळ्यांचा फडशा

श्री क्षेत्र कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे १० जुलै रोजी प्रस्थान

पोतेकरवाडीच्या एकजुटीतून साकारतोय नवीन श्रीराम मंदिराचा मार्ग